यंदाचा शरीरविज्ञान व वैद्यकक्षेत्रासाठीचा नोबेल पुरस्कार कर्करोगासारख्या दुर्धर आजारावरील उपचारांच्या क्रांतिकारी संशोधनाबद्दल अमेरिकेचे वैज्ञानिक जेम्स पी. अॅलिसन आणि जपानचे वैज्ञानिक तासुकू होंजो यांना विभागून देण्यात आला आहे.
'हवामान बदल' या विषयावर काम करणाऱ्या विल्यम नाॅरडस आणि पॉल रोमर या द्वयीला यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जागतिक तापमानवाढ अर्थात ग्लोबल वॉर्मिंग आणि आर्थिक प्रगती यांच्यातील परस्परसंबंधांबाबत या जोडगोळीने केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी त्यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.