ती -भाग ३
आज ८ डिसेंबर.तिचा ४८ वा वाढदिवस .
आज माझ्या आनंदास पारावार नाही.कारणही तसेच आहे नं .
'ती' भाग १ आणि भाग २ वाचलेत? हो तर ठीकच आहे.
नाहीतर ते वाचा बघू .म्हंजे तुम्हाला कळेल अनायासे ...
अपूर्व योग जुळून आला दोन महिन्यांपूर्वी.शिवणमशीन
साठी तेल आणायला गेले असता तेथे एक gasशेगडीचा
डॉक्टर (मेकेनिक ) भेटला.आणि सहर्ष दुसऱ्या दिवशी आमच्या
घरी येईन असे आश्वासन देत फोन नं. ची देवाणघेवाण झाली.
आश्वासन पाळणारे लोक आहेत अजून म्हणून जग चाललेय.
तो आला. शेगडी पाहून इतकी वर्षे झाली तरी उत्तम आहे केवळ
बटनं बदलावी लागतील.आत्ता घेऊन येतो व काम होऊन जाईल
म्हणत बटण आणायला गेला बाहेर.मन चिंती ते वैरी न चिंती.
वाटले ...हा येतो परत कि नाही? बटणे मिळतील कि नाही?ह्या आधी
थातूरमातूर काम करून किती आले आणि किती गेले होते......
पण अशा मन:स्थितीत असतांना -तो आला.आणि मस्त कानाला
इयर फोन लावून(गाणी ऐकत ) साधरण २० मिनिटे उद्योग करत
म्हणतो कसा घ्या रेड्डी तुमची शेगडी.
खरोखर आगदी योग्य बटने लावून दिली होती हो !!
माझा जीव भांड्यात पडला हे काही वेगळे सांगायला नको. ती बटणे
आजतागायत इमाने इतबारे काम करत आहेत हो!!
मग दोन दिवस आधी आठवले वुडन पेंट पडलाय घरात.
मदतनीस घेऊन तिला त्या रंगात रंगविले. आता तर ती
'युनिक पीस ' दिसतेय. ह्या रंगाची शेगडी आजून तरी माझ्या पाहण्यात
नाही.येता का पहायला. या या.केव्हांही या. खूप आवडेल तिला-मला.
काय म्हणताय फोटो पाठवू! o.k.
कुक अलोंग(cook along)मध्ये sandwich पाठवले आहेत
ते ही पहा.तेच तिच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन ******
तिची माझी साथ अशीच राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना .नमस्कार..
ती भाग १ आणि ती भाग २ हे लेख ९ डिसेंबर १७ ला प्रकाशित झाले आहेत.
त्याची लिंक कशी द्यायची मला नाही जमले .कोणास ते करता आले तर अवश्य करावे ही विनंती
'ती' (भाग-१) : https://www.maitrin.com/node/2362
'ती' (भाग-२) : https://www.maitrin.com/node/2363