मायक्रोवेव ओवन मधे रताळ्याचे वेफर्स

आमच्याकडे सहसा रताळे कशी संपवायची असा प्रश्न पडत नाही. पण यावेळी या ना त्या कारणाने रताळ्याचा वापर फारच कमी झाला. उरलेली रताळी संपवायची होती आणि थंडी-पावसात तोंडात टाकायला काहीतरी कुर्कुरीतही हवे होते तेव्हा मावेत रताळ्याच्या चिप्स केल्या. कृती अगदी सोप्पी आहे.

मँडोलिन, सॅलड शूटर वगैरे जे काही स्लाईसर असेल ते वापरुन पातळ चकत्या करून घ्यायच्या. एका मोठ्या रताळ्याला साधारण १ टे. स्पून या मापाने तेल चोळायचे. चवीसाठी जो काही मसाला हवा तो पण चोळायचा. आणि मावेत चालेल अशा थाळीत एका थरात चकत्या पसरायच्या. सुरवातीला १ मिनीट मावेत फिरवून उलटायच्या आणि मग ३०/२०/१० सेकंदांच्या अवधीने मावे करत अंदाज घ्यायचा. माझ्या मावेत मोठी डिनर प्लेट भरुन ठेवले तर अडीच मिनीटे आणि सॅलड प्लेट ठेवली तर ७५-८० सेकंद लागतात.
मी एक रताळे ऑलीव ऑइल + मसाला आणि नुसते एक खोबरेल तेल वाले, मीठही नाही असे केले. दोन्हीला सारखाच वेळ लागला. शेवटी शेवटी अजून १० सेकंद केले तर एकदम कुरकुरीत अशा स्टेजला थांबले. चिप्स बाहेर काढल्या आणि ५ मिनीटे थांबून बघितल्या तर मस्त कुरकुरीत झाल्या होत्या. तेव्हा एकंदरीत तुमच्याकडचे रताळे आणि मावे या दोन्हींचा अंदाज घेत या चिप्स कराव्या लागतात. मी जे रताळे म्हणत आहे ते अमेरीकेतले स्वीट पोटॅटो आतून केशरी रंगाचे असतात ते. आतुन पांढरे असलेल्या रताळ्यासाठी हे कितपत उपयोगी पडेल ते माहीत नाही.

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle