मी दिलेलं नाव - काळे लाडू .. रंग तसाच असतो ना :P
फार सोप्पा अतिशय चविष्ट! पण उष्ण असल्याने वर्षातून एकदाच भरपूर तुप घालून खाता येतं.. :straightface:
कृती - बाजरीची भाकरी करायची .. मग थंड झाल्यावर भाकरीचा चुरा करायचा / मिक्सरमधून फिरवून घ्यायचं
भाकरी थंड होईपर्यंत पाणी गरम करायला ठेवायच .. त्यात गुळ चिरुन घालायचा.. गुळ विरघळून गुळवणी तय्यार! त्यात थोडीशी सुंठपुड घालायची.. मग ही गुळवणी थोडं थोडं करुन बाजरीच्या चुर्यात घालायची .. हा चुरा तसा भरपूर गुळवणी पिऊन घेतो .. चवीप्रमाणे गोडसर करता येतं .. हाताने व्यवस्थित एकजीव करुन लाडू करायचे अन बोटाने त्यात मधे दाब देऊन खोलगट करायच ..लाडू तय्यार!
खायला घेताना लाडूत तूप घालायचं! हे लाडू मुरल्यावर फार मस्त लागतात!
बाजरीच्या ३ भाकरी करता मी १ वाटी चिरलेला गुळ अन जवळपास दोन ग्लास पाणी घेतलं.. त्यात ८ लाडू तयार झालेत
टिप - हे लाडू संक्रांत दिवशी बघायचे नसतात ..ह्याच कारण माहीत नाही (बहुदा माझ्यासारखे गोड खाऊ हा लाडू मुरु देत नसणार म्हणून ही युक्ती असावी! )