शुभप्रभात

शुभ प्रभात
आकाशाच्या गाली लाली
पाहुनी शुक्रचांदणी हसली
म्हणत फिरली माघारी
सकाळ घेणार भरारी
उषा धावली निशेपाठी
नाही घडत भेटी-गाठी
कोण करतेय आडकाठी
उषेच्या भाळी पडली आठी
रिझविण्यास तीस ........
पक्षी गाणी गाती
स्वरांची मग जुगलबंदी
फुले बहरती, झाडे डोलती
सुगंधी दरवळ मादक धुंदी
नटली सोनेरी पहाडी अन्
शोभती चंदेरी जलधारांचे काठ
उषा पाहे आवडीनं
निराशेची टाके कात ....
शुभप्रभात .....
उषा सरसावली एक पायरी
जरा कलंडली (झोपली)भर दुपारी
दुपार ठाकली काम करता-करता
संध्या म्हणाली- पुरे पुरे आता
निशेस चढली नशा __
भेटीची आशा ......येईल उषा .......
विजया केळकर__________

कविता: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle