काही वर्षांपूर्वी लोणावळ्यातील एका शिखरावर बांधलेल्या अप्परडेक नामक रिसॉर्टमध्ये ऐन जुलै महिन्यात जाण्याचा योग आला होता. तिथेच टिपलेली काही प्र.चि.
१. सावळ्या ढगांना या पाण्याचं ओझं पेलेनासं झालंय जणू आणि आता कोणत्याही क्षणी ते बरसतील
२. पण त्याआधी अंमळ डोंगरमाथ्यावर विसावून घेऊ
३. श्रावणातील ऊन-पावसाचा एकत्र खेळ
४.हे ठिकाण इतकं उंचावर आहे की कैक वेळेस पाऊस खाली दरीत डोकावल्यावरच पडत असलेला जाणवायचा, रिसॉर्टच्या लेव्हलला फक्त ढग आणि धुकेच
५. हे नंतरचे निवळलेले आभाळ