समाजऋण
माधवी समीर जोशी, ठाणे
आपल्या प्रत्येकांला काही ऋण जीवनात चुकते करावें लागतात. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे ऋण समाजोपयोगी कामे करून,सगळे नियम पाळून, गरीब, दुर्लक्षित घटकांसाठी कामे करून काहीअंशी फेडू शकतो
नुकतीच आम्ही शबरी सेवा समितीच्या रायगड जिल्ह्यातील कर्जत जवळील कशेळे केंद्राला भेट दिली.येथे ५वी पासून पुढे शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींसाठी वसतिगृह आहे. ज्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे ती 30 मुले मुली येथे अगदी घरासारखीच राहतात, वसतिगृहाची स्वच्छता मुलेच करतात.वसतिगृह परिसरात सुंदर बाग मुलांनी श्रमदानातून फुलवली आहे. परंतु वसतिगृह हे ह्या संस्थेचे मुख्य ध्येय नसून कुपोषण , शिक्षण आणि महिला सक्षमीकरण ह्या क्षेत्रात मुख्य काम चालते.ठाणे , रायगड ,पालघर व नंदुरबार जिल्हात ही संस्था कार्यरत आह
अतिशय दुर्गम भागात या संस्थेचे स्थानिक कार्यकर्ते कुपोषित मुलांपर्यंत पोचुन त्याच्यांपर्यत वैद्यकीय सेवा पोचवतात. जास्त प्रमाणात आजारी असेल तर हॉस्पिटलमध्ये दाखल करतात.रोज 200 बालकांना पोषक आहार दिला जातो. बालवाड्यातुन साधारण ४५० बालक तसेंच अभ्यासिकाद्वारे अभ्यासात थोडे मागे पडलेले ६५० विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासाशिवाय अनेक हस्तकौशल्य शिकवले जातात.दहीहंडीच्या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकहंडी च्या ( चांगली पुस्तके) त्यांना देऊन मदत करू शकतो.
फलोद्यान,वनीकरण, आणि अनेक सिंचन प्रकल्प सुद्धा ह्या संस्थेतर्फे राबविले जातात. ह्या संस्थेचे विशेष म्हणजे लाभार्थ्यांना निम्मा खर्च आणि श्रमदान करायचे आहे. त्या मुळे पैशाचा योग्य वापर केला जातो आणि या बांधवाना स्वाभिमानाने त्यांच्या पायावर उभं रहायला सहाय्य होते. महिलांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी शिवणकाम प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात.एक विशेष उपक्रम म्हणजे सामुहिक डोहाळे जेवण त्या मध्ये गर्भवती स्त्रियांची गुळ-खोबरं , हिरवे मुग व साडी देऊन ओटी भरतात.आदिवासी भागात कर्ज काढून लग्न करू नये म्हणून दरवर्षी सामुहिक विवाह सोहळा आयोजित केला जातो.दिवाळी फराळ वाटप , सामुदायिक विवाह यामध्ये ही आपण यथाशक्ती हातभार लावू शकतो.२००३ मध्ये स्थापन झालेल्या ह्या संस्थेच्या उत्पन्नापैकी फक्त ४% खर्च प्रशासकीय कामांवर होतो.
प्रसिद्धी परामुख ह्या छोट्या संस्थेला निस्पृह कार्यकर्ते आणि आर्थिक पाठबळाची गरज आहे.आपल्यातील अनेकांना वाढदिवस किंवा आनंदाच्या प्रसंगी काही तरी मदत कोणत्या तरी संस्थेला करावीशी वाटते परंतु योग्य संस्था कळत नाही त्या साठी हा लेखन प्रपंच
Contac Detail:-प्रमोद करंदीकर-9920516405 , प्रकाश कानडे- 9867598242
माझी ही पोस्ट तुम्ही नक्की शेयर करा त्या मुळे ह्या उत्तम काम करणाऱ्या संस्थेची सर्वांना ओळख होईल.