नको झालीत स्थलांतरं
मी झाड झाले असते तर?
स्थलांतर टळलं असतं
पण स्थित्यंतराचं काय?
आणि पालवीचे नवे धुमारे?
ते ही पुसावेत स्मृतीतून
होऊच नये पानगळ
अचल निश्चल शांत स्थिर
उभं राहणं जमलं असतं का?
झाडाला मोह टाळता येतो ना?
मला झाड करा ...
वठलेलं निष्पर्ण अविचल असं
मला झाड करा
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle