सक्युलंटस्

सक्युलंटस्! सक्युलंटस्!! सक्युलंटस्!!!

बागकामाचं मला वेड होतं, आवड होती अशातला काही भाग नाही. पण इथे स्वीडनला आल्यापासून मला जाणवायला लागलं कि घरात झाडं हवीत. स्वीडनच्या लांब आणि हार्श विंटरला सहन करण्यासाठी घरात हिरवळ असणं आवश्यक होतं. कारण बाहेर सगळीकडे बर्फ आणि झाडांचे खराटे झाले होते. 
मग सुरु झाला झाडांचा शोध. 
इनडोअर प्लांट्स मध्ये सगळी फिरंगी झाड होती. आपल्या फुलझाडांना ऊन असणं महत्वाचं असतं त्यामुळे ती आधीच लिस्टमधून बाद होती. 
मग काही इनडोअर झाडं आणली. 
पण ते काय म्हणतात तसं,
I was not amused...
मग अचानक आयकिया मध्ये फिरताना ती दिसली. 
सक्युलंटस्...
त्यांना मी सरसकट कॅक्टस म्हणायचे आधी. पण ते चुकीचं आहे हे नंतर कळलं. 
कॅक्टाय हा सक्युलंट्सचा सबसेट आहे. 
मला हे जग नवीनच होतं. अगदी थोड्या पाण्यावरही जगणारी, आपल्या पानात पाणी साठवून ठेवणारी हि पिट्टूकली झाडं खूप सुंदर दिसत होती. मग त्यातली २-३ घेऊन घरी आले. 
पिंटरेस्टवर सक्युलंटस् म्हणून सर्च करून बघितलं तर ठार! इतके गोड आणि वेड लावतील असे फोटोज. 
सिंगल सक्युलंटसचे, त्यांच्या पिल्लांचे, त्यांच्या वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये केलेल्या अरेंजमेंटचे... कित्येक तास घालवले मी ते बघण्यात. 

मग मात्र सक्युलंटसचा छंद लागला. आणखी काही नवी सक्युलंटस् घरात आली. त्यांची काळजी कशी घ्यायची, पाणी किती आणि कधी घालायचं हे सगळं हळूहळू व्हिडीओज पाहून शिकत होते. 
त्यांनी चांगली तकाकी आणि जोर धरल्यावर मग काही दिवसांनी सुरु झाला माझा प्रपोगेशनचा शोध. 
आपण मुली मुळातच नवीन निर्माण करणाऱ्या असतो. मला त्या सक्युलंट्सपासून नवीन सक्युलंटस् तयार करायची इच्छा काही गप्प बसू देईना. 
मग काय? 
पुन्हा युट्यूब, पुन्हा पिंटरेस्ट! 
प्रपोगेशनचे य व्हिडीओज बघितल्यावर मग मी ठरवलं कि आता आपण हे ट्राय करण्यासाठी तयार आहोत. 
इतके लोक करतात, आपल्यालाही जमेलच हळूहळू. 
मग अगदी ४-५ पानांपासून सुरुवात करायचं ठरवलं. 

प्रपोगेशन म्हणजे एका सक्युलंटच्या पानापासून दुसरी पिल्लू सक्युलंटस बनवण्यापर्यंतचा प्रवास. 
पहिली पायरी म्हणजे मोठ्या झाडाची म्हणजेच पॅरेण्ट झाडाची हेल्दी पाने काढणे. हे करताना बरीच काळजी घ्यावी लागते. खालची पाने सगळ्यात उत्तम. पण काढताना ते पूर्ण निघालं पाहिजे, त्याचा अगदी इतकुसा सुद्धा देठ झाडाला चिकटून नको राहायला. 
पाने निघाली कि १-२ दिवस ती तशीच कागदावर ठेवायची, त्यांचा देठाचा भाग पूर्ण वाळण्यासाठी.
मग एका पसरट कुंडीत माती भरून, त्यात हि पाने नुसतीच ठेवायची. 
दर दोन दिवसांनी त्यांच्यावर अगदी हलके पाणी फवारत राहायचे. अगदी हलके हां...धुक्यानंतर दवबिंदू कसे साठतील, अगदी तितकेच. 

पहिल्या बॅचमधली तीनचार पानं वाळून गेली. दोन मात्र जगली. त्यातलं एकपण वाळलं. एक मात्र जगलं, त्याला आता मुळं फुटलीयेत. 
दुसरी बॅच थोडी मोठी करूया असं ठरवलं होतं त्यामुळे वीस पानांची दुसरी बॅच तयार केली. त्या बॅचमधली काही पाने वॉटर प्रपोगेशनला लावली. मग आमची वार्षिक ट्रिप करून आलो आठवडाभराची. आल्यावर पाहिलं तर मस्त बारीक बारीक पाने अाली होती आणि मुळंही फुटली होती पानांना. मी आज सांगू मी सांगू कोणाला आज आनंदीआनंद झाला या मोडात :) खूप मस्त वाटतंय ती इवली इवली पाने बघून.
आजच्या दिवसात जमेल तसे फोटो टाकते सगळ्या प्रोसेसचे.
तुमच्याही सक्युलंटस् स्टोरीज येऊ द्या मुलींनो :)

~~~~~~~~~~~~~~~
संबंधीत धागे :
बागकाम
वृक्षारोपण आणि आपण

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle