ह्या आधीचा भाग इथे वाचा.
काही आधी एअरपोर्ट ला भेटून एकत्र आले तर काही यायचे होते. वयाची रेंज २.५ वर्षाच्या लहानग्यापासून, १४-१५ वर्षाच्या मुलांपासून, ७८ वर्षाच्या तरूण आजोबांपर्यंत होती. लवकर जेवण झालेल्यांनी बकिच्यांचे जेवण होइपर्यंत किकांबरोबर बसून आपल्याला कोणकोणते पक्षी दिसणार त्याची चर्चा आणी यादी करायला सुरुवात केली. सगळ्यांचे होइतो ४ वाजून गेल्याने आणि बरेचसे पुणेकर असल्याने तिथेच चहाही झाला आणि ५ वाजता आम्ही चक्राताला निघालो. आम्ही एकूण २७ जण होतो. ४ जीप्स अरेंज केल्या होत्या त्यातून आमचा प्रवास चालु झाला.
वाटेत कल्सी गावाजवळ यमुना नदीवर थांबलो
इथुनच पक्षी निरिक्षणाला सुरुवात झाली. इथे आम्हाला House Crow, Red-vented Bulbul, Common Pigeon, Rose-ringed Parakeet, Black Kite तसेच पाणथळीत असणारे River Lapwing, Little Cormorant, Indian Pond Heron, Pied Kingfisher दिसले. Pied Kingfisher ने हवेत २ सेकंद थांबून फोटोला पोज दिली होती पण उजेड कमी झाला होता त्यामुळे छान फोटो नाही घेता आले. इथेच Blue-tailed Bee-eater हा पण दिसला. अजुन एक वैशिष्ठ्य म्हणजे इथे आम्हाला खूप मोठया संख्येने म्हणजे अंदाजे ३०० Streak-throated Swallow दिसल्या. मधेच एकत्र उडत होत्या, मधेच तारेवर बसत होत्या आणि मधेच तर जमिनीवर पण बसत होत्या. पाकोळ्या अशा जमिनीवर बसलेल्या कधीच बघितल्या नव्हत्या.
इथुन पुढे हवा हळुहळु थंड होऊ लागली.
हवेतला गारठा, रस्त्यांचे चढ उतार, झाडं यावरून आपण हिमालयाच्या जवळ येत आहोत हे जाणवायला लागलं.
८-८:१५ ला चक्राताला पोहोचलो. त्यापुढे ५ किमी. वर आमचे रिसॉर्ट 'हिमालयन पॅरेडाइज' आहे तिथपर्यंत जातानाचा रस्ता चांगलेच गारठलो होतो. गाड्यांमधून खाली उतरलो आणि थंडीचा तडाखा आणखीनच जाणवला. स्टाफला बहुदा कलपना असावीच. उतरल्या उतरल्या गरमा गरम चहाने आमचे स्वागत झाले. अमृततुल्य चहा आणि रिसॉर्टची देखणी वास्तु यामुळे जीव सुखावला.
रूम्स बघून तर एकदम अहाहा झाले.
सगळेच दमलेले असल्याने रात्री जेवण, गप्पा उरकून ९:३०- १० लाच सगळे झोपायला गेलो. लवकर उठव असं १०० वेळा लेकाने बजावल्याने ४:३० चाच गजर लावून आम्ही झोपलो. उद्याची सकाळ अफलातून इतकी असणार होती हे आधी माहित असतं तर एक्साइटमेंटने रात्रीच मला झोप लागली नसती.
ह्या नंतरचा भाग इथे वाचा.