ऑक्टोबर २०१९ मध्ये किरण पुरंदर्यांच्या निसर्ग निरीक्षण शिबिरासाठी चक्राताला जाऊन आल्यानंतर मी चक्राताचं एवढं वर्णन घरीदारी केलं होतं, की ते ऐकून ऐकून माझ्या घरच्यांनाही चक्राताला जावंसं वाटायला लागलं होतं. त्यामुळे २०२२ मध्ये प्रवास करता येईल अशी खात्री वाटल्यावर एप्रिलमधली चक्राताची सहल ठरवून टाकली. आधी तेव्हा किकांचं शिबिर असणार आहे का, याची चाचपणी केली, पण त्यांचा तेव्हा तरी तसा विचार नसल्याचं कळल्यावर आमचे आम्हीच जायचं ठरवलं.
कॅम्पचा शेवटचा दिवस होता. टायगर फॉल्सला ५ किमी चालतच जायचं ठरलं होतं पण रात्री खूप मोठा वादळी पाऊस झाल्याने वाटा निसरड्या झाल्या असणार होत्या. शिवाय ग्रुप मधे ट्रेकर्स तर नव्हतेच पण अगदी छोटे आणि ज्येष्ठ नागरिकही होते. त्यामुळे गाड्यांनीच तिथे जायचं ठरलं. आणि गाड्यांनीच जायचंय तर आधी तरी पाय मोकळे करू म्हणून आम्ही ६:३० वाजता रिसॉर्टच्या रस्त्यावरून पुढे ग्वासापूल म्हणजे साधारण १.५ किमी पर्यंत गेलो.
एकंदर असं लक्षात आलं होतं की सूर्य उगवण्याआधी आणि मावळल्यानंतर तापमान खाली जायचे. रात्री वारा सुटलेला असायचा. त्यात रात्री दिवे गेले. जनरेटरवर गरजेच्या गोष्टी चालु होत्या. रूम्सवर एखादा पॉईंट आणि नाइट लॅम्प इतकच चालु होतं. कॅमेरा कसाबसा चार्ज केला त्यामुळे मोबाइल चार्ज झाला नाही. मोबाइलचा उपयोग पण फोटो काढण्यासाठीच होता. चारही दिवस सोशल मिडियाची आठवण फारच क्वचित आली.
जातानाच भरपेट नाष्ता करून ९-९:१५ ला निघालो. मधे लोखंडी नावाचे जरा मोठेसे जंक्शन लागते.तिथून पुढे कोटी कनासर ला गेलो. रस्त्यातून जाताना प्रत्येक वेळी पक्षी दिसले की थांबून फोटो सेशन, चर्चा असं चालू होतं. जातानाच देवदार चे मोठे वृक्ष लक्ष वेधून घेत होते.
दगडी बांधकाम केलेल्या आणि लाकडाचा भरपूर वापर केलेल्या खोल्या मस्त उबदार होत्या. पांघरूण १.५-२ इंच जाडीचं आणि चांगलं जड होतं. ४:३० चा गजर बंद केला पण पांघरूणातून बाहेर येऊ वाटेना. परत झोप लागणार असं वाटत होतं तोवर अंदाजे ५ वाजता पक्षांचे आवाज येऊ लागले होते. प्रोमिनंट येत होते ते आवाज होते Black Francolin आणि Great Barbet यांचे! किका म्हणतात Black Francolin चा कॉल 'चीक पान बिडी सिगरेट' असं म्हणल्यासारखा असतो हे अगदी तंतोतंत पटलं. न रहावून बाहेर आलोच.
एप्रिल मधे परिक्षा संपल्यावर मेल परत चेक केले. आमच्याकडे चांगली दुर्बिण नव्हती. किकांना विचारून दुर्बिणीने चक्राता शॉपिंगचा श्रीगणेशा केला. (इथेच लेकाला नक्की समजलं की आम्ही कँपची तयारी करत आहोत.)
मग कॅमोफ्लाज कपडे, चांगले शूज ही सगळी खरेदी झाली. गरज असलेल्यांबरोबर गरज नसलेल्यांनीही (पक्षी लेकाने) हात, आमचे खिसे साफ करून घेतले. फोटोग्राफी शिकायचं बकेट लिस्ट्मधे केव्हाचं आहे पण ते न झाल्याने अजुन मोठी, चांगली लेन्स विकत किंवा भाड्याने घ्यायचं रद्द केलं.
दोन वर्षांपूर्वी एका मैत्रिणीकडून किरण पुरंदरेंबद्दल समजले. लेकाला पुण्याजवळच्या एक दिवसाच्या कॅंपला पाठवले. त्याला कँप प्रचंड आवडला. पक्षी बघणे तर आनंददायी आहेच पण किरण पुरंदरेंबरोबर पक्षी बघणे खूपच रिफ्रेशिंग आहे. त्यांना सर वगैरे म्हणलेलं आवडत नाही आणि एकेरी किरण कसं म्हणणार त्यामुळे ते मुलांचे किरण काका आणि नंतर सगळ्यांचेच किका झाले. सगळे त्यांना किका म्हणूनच ओळखतात.