ह्या आधीचा भाग इथे वाचा.
२ दिवस हा सुंदर पक्षी दिसत होता पण छान फोटो मिळत नव्हता आज त्याचा मनासारखा फोटो मिळाला
Verditer Flycatcher
हा सुतार पक्षी पण आवारातच दिसला. ही म्हणायला हवं कारण फिमेल आहे.
scally bellied woodpecker female
ग्रेट बार्बेटचा चांगला फोटो नाही पण आहे तोच देते. रिसोर्ट समोरच्या दरीत त्यांची कम्युनिटी होती. ग्रेट बार्बेट हा तांबट म्हणजे कॉपर स्मिथ बार्बेटचा चुलत भाऊ. आवाज आणि रंग थोडे वेगळे असतात
बुधेर केव्ह्ज ला जाण्यासाठी आधी कनासरजवळ गेलो. एके ठिकाणी आमचं पॅक्ड लंच आम्हाला दिलं आणि आमचा ट्रेल चालु झाला. बरोब्बर २.५ किमी. चाललो आणि जे काय समोर आलं ते अप्रतिम होतं.
सगळीकडे फक्त आणि फक्त हिरव्यागार टेकड्या. इथे सगळ्यांनी गोलात बसुन आपलं पॅक्ड लंच केलं. एकदम शाळेच्या ट्रिपला गेल्यासारखं वाटलं. :)
गुहेत आत जाण्यासाठी अगदी निमुळता रस्ता आहे. रस्ता नाहीच भोक आहे एक! खाली पण पाणी आणि मोठे मोठे दगड आहेत.
आत उभं रहायला पण जास्त जागा नाही त्यामुळे एका वेळी ४ जण आणि एक गाइड म्हणजे किका असे ५ जणंच आत जाऊ शकत होते.
आत पाणी साठलेलं होतं. काही ठिकाणी बर्फ पण जमला होता. आत मधे छोट्या गंधकाच्या कांड्या पण बघायला मिळतात. गुहा अगडी छोटी आहे पण मिट्ट काळोख असतो. प्रत्येकाच्या हातात टोर्च अत्यवश्यक आहे. अगदी थोडंच आत जाता येतं त्यानंतर तिथे एक अचानक १० फुट खोल खड्डा आहे. टोर्चने बघितलं तर खड्ड्यात पाणी आहे आणि आतून जायला रस्ता आहे. पण तिथून पुढे आजवर कुणी गेले नाही असं स्थानिक म्हणाले.
हे मंदीर खूप जुणं आहे.
ह्या मंदिराबद्दल मला फार काही माहिती नाहिये.
परत येतानाच्या रस्ता
इथे स्थानिकांना झाडं तोडू नका असं सांगतातच पण त्याचबरोबर त्यांना झाडं न तोडल्याबद्द्ल रिवॉर्ड देतात. आयुष्य संपत आलेली
ठराविक झाडं तोडून त्याचा दरवर्षी लिलाव करतात. गावकर्यांना हे लाकूड फुकट देऊन टाकतात. अर्थात त्याचे पण नियम आहेत असं ऐकलं. त्यांना हे लाकूड स्वतःच्या वापारासाठी दिलेलं असतं. त्यांना ते विकायची परवानगी नाही. झाडं तोडतात तेवढीच परत लावतात त्या नविन जनरेशनला जागा पण होते आणि लाकूड हवं तेव्हा मिळतंय ह्यामुळे गावकरी काळजी पण घेतात. मला हा प्रकार फार आवडला.
येताना ड्रायव्हरने एका छोटीला थांबवून तिच्याकडून ओला मसूर घेतला. आपण जसा ओला हरभरा खातो तसंच हे लोक हा मसूर खातात
येताना खूप धनगर आणि त्यांच्या खूप म्हणजे प्रचंड प्रमाणात गाई म्हशी दिसल्या. आपली जनावरं ओळखता यावी म्हणून काहींनी त्यांना मेंदी लावली होती. त्यामुळे त्या लाल, केशरी शेडेड गाई फारच कॉमेडी दिसत होत्या. धनगर लोक मोस्ट्ली मोमेडियन कम्युनिटी होती. हे लोक आता बर्फ पडेपर्यंत इथल्या जंगलांमधेच मुक्काम करतात. इथे बर्फ पडला की खाली अजून जंगलं आहेत तिथे बर्फ नसतो तिकडे जाउन रहातात. थोड्या वेळापूर्वी दिसलेल्या हिरव्या टेकड्या इतकी जनावरं रोज चरायला नेली तर संपून जातील असं मनात आल्याशिवाय राहिलं नाही. :straightface:
आज रिसॉर्ट्वर आल्या आल्या हे Rhododendron सरबत आम्हाला दिले. ज्यांना चहा हवा त्यांना चहा पण ठेवला होता. आम्हाला चहाचा अपमान करायचा नव्हता. :ड आम्ही सरबत पिऊन वर चहा प्यायला. खरं तर मला Rhododendron फार नाही आवडले. :P आणि तिथे सकाळी ६ वाजता आणि संध्याकाळी ७-७:३० ला दोन्ही वेळा थंडी इतकी असायची की त्यात चहा न पिणं म्हणजे एका मोठ्या आनंदाला मुकण्यासारखं होतं.
या नंतरचा भाग इथे वाचा.