चक्राता - कोटी कनासर, मंगताड

ह्या आधीचा भाग इथे वाचा.

जातानाच भरपेट नाष्ता करून ९-९:१५ ला निघालो. मधे लोखंडी नावाचे जरा मोठेसे जंक्शन लागते.तिथून पुढे कोटी कनासर ला गेलो. रस्त्यातून जाताना प्रत्येक वेळी पक्षी दिसले की थांबून फोटो सेशन, चर्चा असं चालू होतं. जातानाच देवदार चे मोठे वृक्ष लक्ष वेधून घेत होते.
Devdar.JPG

इतर ही बरीच झाडं होती. Rhododendron नावाचं झाड दाखवलं. या झाडाची फुलं वापरून सरबत तयार करतात. लोकल भाषेत त्याला बुरांश म्हणतात. साधारण आपल्या कोकम आणि Rooh Afza यांच्या मिश्र चवीचे सरबत तयार होते.
हे ते फूल
Rhododendron.JPG

कोटी कनासर ह्या जागेला देवबन म्हणतात. आपल्याकडे जशी देवराई तीच कॉन्सेप्ट! इथले वृक्ष संवर्धन करून ठेवतात. इथे दोन भले मोठे देवदारचे वृक्ष आहेत जे ४०० वर्षं जुने आहेत. त्यांचा बुंधा ६.५ मीटर आहे.
हे त्यातलं एक झाड.
Devdar1 - Copy.JPG
Devdar1.JPG

येताना बरोबर जेवणही आणलंच होतं. टिंडाची भाजी, फुलके, राजमा, चावल असं भरपेट जेवण करून काही जण तिथे लवंडले आणि तरुणाई इकडे तिकडे भटकू लागली. या वर दाखवलेल्या झाडाचं जवळून निरिक्षण केल्यावर त्यावर आम्हाला Treecreeper दिसला. इतका बेमालूम कॅमोफ्लेज झाला होता. या झाडावर त्याचं अ‍ॅक्टिव्ह घरटं होतं
Bar Tailed Treecreeper
Bar Tailed Treecreeper.JPG

इथे थोडावेळ भटकून आम्ही चालत मंगताड गावाकडे निघालो. हा ट्रेल कम ट्रेक झाला. पण इथल्या स्थानिक लोकांची घरं, शेतं हे बघायला मजा आली. कर्ती माणसं कामावर गेली होती. बर्‍यापैकी सर्व घरांतून लहान लहान मुलं आणि/ किंवा म्हातारी माणसं होती. घरांना कुलुपं वगैरे भनगड नव्हतीच.

ऑथेंटिक पद्धतीची ही घरं लाकडी असतात. दगडांच्या कपच्यांची कौलं असतात. हल्ली पत्रे देखील वापरतात. ह्या घरांना रंग देतात तोही ह्यांच्या इथल्या मातीतून नॅचरली मिळतो. अर्थात काही घरं तयार रंगांनी रंगवलेलीही होतीच.
Mangtad1.JPGMangtad2.JPG
स्थानिक. फोटो त्यांना खुणांनी विचारून काढ्ले. पण अजुन बोलायला गेलो तर त्यांना भाषा समजेना त्यामुळे गप्पा मारता आल्या नाहीत. स्थानिक भाषा जौहारी आहे. हिंदी सारखीच असली तरी पटकन समजत नाही.
Mangtad3.JPGMangtad4.JPG

येताना लोखंडी गावात थांबून गरम चहा आणि बिस्किटं खाल्ली. तिथे या हिमालयन शेळीने मला मस्त पोज दिली. मग तिच्या
मालकिणीचा पण फोटो घेतला.
Local1.jpgLocal.jpg
Local2.jpg
सूर्य मावळतीला गेला तशी थंडी वाढू लागली. ७-७:३० ला रिसॉर्ट्ला परत आलो. थोडं फ्रेश होउन डायनिंग रूम मधे परत जमलो आणि आज कोणकोणते पक्षी कुठे बघितले, त्यांची वैशिष्ठ्ये इत्यादी गप्पा मारल्या. यादी केली. तोवर जेवण तयार असल्याचे सांगितले. थंडी भरपूर होती. जोरात पाऊसही आला त्यामुळे जेवण झाल्यावर मुकाट झोपायला गेलो.

ह्या नंतरचा भाग इथे वाचा.

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle