दुःखाचे गडद दाटले
चाहूलीने काळीज फाटले
काळ्याशार डोही श्वास कोंडले
मी जीवाच्या आकांते भांडले
वर येण्या धडपडले
अचानक खोल काही हलले
दुःखाचे दुःख उलगडले
ते माझ्याशी हमसूनी रडले
मी त्यास मायेने कवटाळीले
त्याचे अन् माझेही श्वास मोकळे
त्या काळ्या डोही चांदणे तेजाळले
आणि सहजीच त्याचे रूप पालटले
दुःख हासले आणि सुखी जाहले.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle