स्पॅनिश वारी
प्रसंग १
प्रसंग -शाळेतल्या मैत्रीणींच बर्एच दिवसानी जमवलेल गेट टूगेदर! एप्रिल १८ ची एक रविवार सकाळ
स्थळ - वाडेशवर ( हे वर्षानुवर्षे बदलत नाही)
पात्र परिचय - १९८७ मधे दहावी झालेल्या ( काकू मत कहो ना ) ८-१० मुली
अ- वाडेश्वर चा कंटाळा आला आता दुसरी जागा पाहू
ब- मी केव्हापासून म्हणतेय माझ्या गिरीवनच्या फार्महाउस वर जाउ दोन दिवस
क- मे महिन्यात जमेल का ?
अ, ड फ - अमुक कारण , तमुक कारण , ढमुक कारण , नाही
क - १५ ऑगस्ट ?
ब, ए , स- अमुक कारण , तमुक कारण , ढमुक कारण , नाही
अ- हे अस जवळपासच ठरवतो आपण म्हणून पार पडत नाहीत आपले बेत . आपण क्ष कडे जर्मनीला जाउ!
ब - लवाजमा घेउन तिच्या गह्री जाण्यापेक्षा इतर जागा शोधू युरोपात , क्ष ला पण बोलाउ तिथेच
एव्हाना अमुक ढमुक तमुक कारणांनी आप्पे अन सेट डोसा मागवायचा का यावर खल चालू केलेला असतो
नेहेमीच्या गप्पा मारून , वाडेशवराला दक्षिणा देउन पोरी बाहेर उभ्या राहून आता परत कधी भेटयच चा प्लॅन करत असतात .
दहावी पर्यंत एकत्र एकाच वाटेवर चालून आता आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावरच्या , ह्या मैत्रीणींच्या प्रायॉरिटीज पण वळणानुरूप असतात . युरोपाच सोडाच पण पुन्हा भेटण्याबाबतही , काहीच न ठरवता सगळ्या सखू वेशी वरून माघारी घरी !!
प्रसंग २
प्रसंग एक प्रमाणेच
तारीख ऑगस्ट १८
तपशील पहिल्या प्रमाणेच
एक वाढिव तपशील , स्पेन ला जाउया !!
सखू वेशी वरून माघारी घरी !!
प्रसंग २ नंतर वर्गाच्या वॉट्स अॅप ग्रुप वर स एक खडा टाकते , स्पेन ट्रीप चे ३ पर्याय , शेवटचा घाबरत घाबरत ( माहितही नसेल कोणाला ह्या खात्रीनी ) कामिनो द सांतियागो!!
अजून दोन जणींचे डोळे चम्कतात अन तिसरी विचारते काय आहे ग हे !
-क्रमशः