सतत कोणा पाशी व्यक्त होण्याची तगमग,
मला पुन्हा एकटेपणाच्या अंधारात ढकलते.
नव्याने खंबीरपणाचा पोपडा चढतो
मी ओबड धोबड होत जातेय
मला माझे स्पर्श अनोळखी होत चाल्लेत
काही दिवस पुरेल ही one way communication ची ,
‘राजाचे कान सुपा येवढे’ गोष्टीतल्या झाडाची ढोली
पण हे झाडही तोडून टाकेल कोणी तरी
त्यातनं गाणारी वाद्य बनतील की
रद्दीचे कागद की
मेलेल्या जनावरात भरायचा भुसा?
कोणास ठाऊक
तरी मी इथे बोलत राहीन,
हे झाड जीवंत आहे तोवर
किंवा
कोणी वहिवाटीचा हक्क नाकारे पर्यन्त.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle