रंग माझा वेगळा- भाग -२
काय मग कशी काय ? एकदम फ्रेश ना ? सकाळ सकाळी त्याचा मेसेज बघून ती सुखावली . अरे याला कस कळलं आपण फ्रेश आहोत ते. आय मिन रात्री मस्त झोप लागली ते . काहीतरी खास आहे त्याच्या वागण्या -बोलण्यात . " येस एकदम फ्रेश . ती बोलून गेली . " मला माहितीच होत तू रात्रीच फ्रेश झाली असणार ते. " अरे मनकवडा आहे का हा ? "चल चल जास्त बोलू नकोस " ती पटकन बोलून गेली . " अग माझ्याशी बोलल्यानंतर कोणीही फ्रेश च होत माहितीये मला ? "आता मात्र तू जास्तच भाव खायला लागला आहेस ह . एवढं पण नाही काही" ती त्याला झटकून देत म्हणाली
"बर ते जाऊदे. एक मस्त स्माईल दे बघू म्हणजे माझ्या दिवसाची सुरवात चांगली होईल बघ " तिच्या मनात आलं ". आता ऑनलाईन स्माईल ने असं काय घडणार आहे " पण तिने हसून दाखवलच ". गुड गर्ल . चल निघतो मी तयारी करायचेय . ऑफिस ला जायचय ". अरे हा ऑफिस ला जातो ? केवढा लहान दिसतो हा .
तिने विचारलच " ऑफिस ? " हो काही प्रॉब्लेम ?
प्रॉब्लेम काही नाही रे पण तू ऑफिस ला जात असशील इतका मोठ्ठा दिसत नाही काही .
वो मेरा सिक्रेट आहे . नही बताऊंगा . चल बाय करून तो झटपट लॉगऑऊट झाला आणि ती मात्र विचार करत बसली त्याचाच
खरंच वंडर आहे हा मुलगा . किती पॉझिटिव्ह एनर्जी देऊन गेला सकाळ सकाळी
मग तिला वाटायला लागलं " अरे इतका का आपण त्याचा विचार करतोय ? असं काय आहे त्याच्यात?"
काय आहे ते समजत नव्हतं पण ती विचार करत होती नक्की . तिची हि दिवसाची सुरवात झाली अशीच . दिवस भर्रकन गेला कामात विचार आहे कोणाला दुसरा विचार करायला . रात्री ऑफिस मधून आल्यावर ती ऑनलाईन आली तर याच्या समोर हिरवा दिवा लागलेला . बापरे आता हा येणार काही तरी बोलायला . मग काय झालं ? आला तर आला . तुला नकोय का तो काही बोलायला ? तिच्या मनात द्वंदव. तेवढ्यात त्यानेच सुरवात केली . "किती उशीर आलीस ग ऑनलाईन . मी कधीची वाट पाहतोय तुझी "
" कारे ?" तिने अचानक विचारलं . तर तो म्हणाला "असच . सगळ्याच का ? ची उत्तर असतात का ? "हो तेही खरंच होत म्हणा .
मग मॅडमजी आज कसा गेला दिवस ? त्याने विचारलं . "मस्त रे . ऑफिस मध्ये इतकं काम असत कि आजू बाजूचा विचार करायला वेळच नसतो काम- काम आणि काम मस्त मजेत वेळ जातो ". "मग छान आहे कि" तो म्हणाला . " चल ग आज जरा लवकर लॉग आऊट होतोय उद्या बोलूया . तिला वाटायला लागलं अरे आता तर आला लगेच काय लॉग आऊट? पण ती म्हणून गेली " ओके. बाय. टेक केयर "आणि ती पण लॉग आउट झालीच