रंग माझा वेगळा -भाग ५

रंग माझा वेगळा -भाग ५

आताशा हळू हळू रोजच त्यांचं ऑनलाईन बोलणं व्हायला लागलं . काही हि सटरफटर विषय असायचे . पण विषयांमध्ये तोच तोच पणा येतोय असं निधीला वाटायला लागलं . एकदा विराज ने तिला विचारलं सुद्धा ". काय झालं ग . आजकाल बोलत नाहीस जास्त "

"अरे रोज उठून काय बोलणार रे. ऑनलाईन फ्रेंडशिप असच असत बघ . थोडे दिवस बोल बोल बोलतो आणि मग विषयच संपून जातात मग बोलायला काहीच उरत नाही . हळू हळू बोलायला कुठलेच विषय नसल्याने रोज मेसेज करणारे आठवड्यात दोन किव्वा तीन वेळा मेसेज करायला लागतात आणि आणखीन काही आठ्वड्यात ते पण बंद होत . ऑनलाईन फ़्रेंडशिप अशीच असते रे. तिला काही आयुष्य नाही . भवितव्य नाही

"असं काय बोलतेस ग. बाकीच्याच असेल पण आपलं तस नाहीये . आपले स्वभाव किती छान जुळताहेत . मला नाही वाटत आपली मैत्री इतक्यातच संपून जाईल . इतकी वीक आहे का आपली मैत्री ?."

ती म्हणाली "बघूया . आताच काही सांगत नाही पण मी इन जनरलच बोलतेय रे "

"चल बावळट कुठची. काहीही बोलते "

निधीच्या लक्षात आल होत हळू हळू बोलण्या बोलण्यात तो जास्त क्लोज येऊ पाहतोय. हरकत नाही ऑनलाईन तर आहोत . भेटणार थोडीच आहे . निधीने तर मनाशी ठरवूनच टाकलं होत . कधी भेटायचं नाही म्हणून. भेटलो कि संपलंच सगळं . आता कोणाचाही जास्त जवळ जायचं नाही . बस झालं

एका दिवस सुटीच्या संध्याकाळची ४ वाजता ती बाहेर जायची तयारी करत होती तेवढयात त्याचा मेसेज आला

" मला विसरू नको हा "

"अरे आता काय झालं याला ?" विचार करून ती ती खुद्कन हसली

तिने पणे मजेत" नाही रे. तुला कोण विसरेल ? पण हे काय ? असं काय बोलतो ?"

तेव्हा लगेच तो म्हणाला " अग मी आता तुझ्या घराजवळ आलो आहे' . निधी घाबरून गेली "म्हणजे रे "

"अग बावळट . डॅड ना एअरपोर्ट वरून आणायला कार मध्ये आहे . सांताक्रूझ जवळ . म्हणजे तुझ्या घराजवळच ना ?

निधीने सुटकेचा निश्वास टाकला " हो रे पण तू ड्राइव्ह करत असताना मेसेज करतोहेस ? बरा आहेस ना ?

" अग सिग्नल ला गाडी होती उभी तेव्हा केला ग . असाच थोडा करीन ? तू पण ना ? "

"अरे पण ड्राइव्ह करत असताना मोबाईल वापरूच नको कि"

"येस मॅडम जशी आपली आज्ञा ." नाटकीपणाने त्याने उत्तर दिल

ती तयारी करत होतीच . तर पंधरा मिनिटातच त्याचा एफबी वरून कॉल पण आला . "माय गॉड कशाला करतो हा कॉल . मी सांगितलं होत त्याला कॉल करू नकोस म्हणून " विचार करत करत तिने उचललाच नाही ." जाऊ दे . कशाला करतो हा " म्हणून ती थोडीशी रागावली होतीच

लगेच त्याचा मेसेज " मी कॉल केला होता ग "

तिने लक्षच नाही दिल . दोन तासांनी त्याचा परत मेसेज . एयरपोर्ट वरून घरी पोचलोय " मी कॉल करतोय तर घेत का नाहीस ग ? "

"मी नाहीं घेणार . आपली ऑनलाईन मैत्री म्हणजे स्ट्रिक्ट ऑनलाईन जास्त जवळ यायचा प्रयत्न करू नकोस"

"अरे नुसता कॉल केला तर तुझ्या अंगाला काटे टोचतात कि काय ?

" हो टोचतात. अचानक कोणी कॉल करत का ? "

"ठीक आहे. आता सांगून करतो तासाभरात करतो . तेव्हा तर घेशील ? "

निधी सटपटली " बघते " पण तू कॉल का करतोस ? "

" अग माझ्या आवाजाचा फील द्यायचाय तुला माझा आवाज चांगला आहे ग . आता पर्यत महिनाभर आपण नुसतेच मेसेज वर बोलतोय ना . मग आता माझा आवाज पण ऐक "

निधीला वाटलं "जरा जास्तच तोडून बोलतोय का आपण त्याला "

"आता जर का कॉल घेतला नाहीस तर मरून जाईन हा मी ". नाटकीपणाने त्याने मेसेज केला

"चल मरून जाईन म्हणे" . निधीने कळवलं " बावळट च आहेस "

निघी स्वतःवरच चकित झाली अरे त्याने " बावळट" म्हटलं तर आपण विचार करायला लागलो हा जवळ येऊ पाहतोय का ? आणि आता आपण ही तसच बोलतोय ? तासाभरातच त्याचा कॉल आलाच . एक मिनिट भर विचार करत निधी नुसतीच मोबाईल कडे बघत राहिली आणि तिने कॉल घेतलाच

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle