रंग माझा वेगळा-भाग ६

रंग माझा वेगळा-भाग ६

निधी ने फोन उचलला काय आणि पुढचे तास भर ते बोलतच राहिले -बोलतच राहिले. निधीने तिच्या पर्सनल गोष्टीं बद्दल विचारण्याची त्याला मनाई केली होती पण त्याने त्याच्या पर्सनल गोष्टी सांगायच्या नाहीत असं त्याने तर काहीच ठरवलं नव्हतं. त्याच म्हणणं होत त्याच्या आयुष्यातल्या घटना या त्याच्या क्लोज फ्रेंड साठी खुल्या आहेत . मग काय बोलण्याची आतषबाजी झडली आणि तासाभराने "तू किती बावळट आहेस "आणि "तू किती येडपट आहे " अगदी "येडुच आहेस तू " या एकमतावर दोघांनी कॉल बंद केला

निधी तर अक्षरशः फुलासारखी तरंगत होती . . खूप काही तरी पॉझिटिव्ह एनर्जी होती त्याच्या बोलण्यात दुसऱ्याचा माईंड सेट बदलून टाकण्याची ताकद होती त्याच्या बोलण्यात . निधी त्याच बोलणं आठवून आठवून आश्चर्य चकित होत होती . खूप काही तरी गोष्टी तिला नव्याने समजल्या होत्या ज्या तिने कधी ऐकल्या नव्हत्या /त्याने सांगितल्या नव्हत्या . तिच्या दुनियेपेक्षा त्या काही तरी खूप म्हणजे खूपच वेगळ्या गोष्टी होत्या. तिच्या आणि त्याच्या आर्थिक परिस्थितीत आणि एकंदरच आजूबाजूच्या कल्चर मध्ये जमीन अस्मानाचा फरक होता . तो एकुलता एक बड्या बिझनेसमन चा मुलगा . नेपियन सी रोड वर ४१ व्या मजल्यावर राहणारा . त्याच्या घरातल्या बेडरूममधून समुद्र दिसतो असं सांगत होता . पहिले दहा फ्लोर तर कार पार्किंग साठी राखून ठेवलेले आणि निधी मिडल क्लास फॅमिलीतली . त्या दोघांमध्ये काही म्हणजे काहीच साम्य नव्हतं . किती तरी गोष्टी तिने कधी स्वप्नांत सुद्धा बघण्याची हिंमत केली नव्हती अशा त्याच्या कडून समजल्या . तिला वाटलं त्याला सांगावं का नको अशा काही गोष्टी ऐकवू रे . का अशाच त्याच्या गोष्टी ऐकत राहूया या द्वंद्वात थोडा वेळ गेला पण त्याच्या गोष्टी ऐकायच्या असं तिने ठरवलं. काहीतरी वेगळे अनुभव वेगळ्या दुनियेतले अनुभव . आपल्याला ऐकताना फ्रेश वाटत ना . मग झालं तर

नाहीतरी तो म्हणतच असतो "तुला खुश झालेल बघण्यात मला आनंद आहे" म्हणून . मग देऊया कि त्याला त्याचा आनंद आणि आपणही खुश होऊया ". . रात्रीचे बरेच वाजले होते . दुसऱ्या दिवशी ऑफिस ला जायचं होतच त्याला आणि तिला पण . . विचार करत करत झोपून गेली आणि सकाळी उठून ऑफिस ला गेली ती संध्याकाळची वाट बघतच . पण आताशा तो जरा नाठाळपणे वागायला लागला होता . सुरवातीला तिची वाट बघणारा तो आता तिला वाट बघायला लावत होता . तिची चीड चीड वाढत होती आणि काही काही वेळा पाठोपाठ दोन दिवस सुद्धा तो यायचाच नाही . पण त्याला तिची नस सापडली होती दोन दिवसांनी का होईना पण सकाळी उठल्या वर विराज च "गुडमॉर्निग" बघितलं कि हि खुश. पाठोपाठ त्याच "सॉरी ग "आणि "त्रास दिल्याबद्दल काही पण शिक्षा दे" हे तर असायचंच . ती काय त्याला शिक्षा देणार होती ? हे त्याला पण माहिती होत .

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle