तुझमे तेरा क्या है - १०

या आधीचे भाग ईथे वाचा
तुझमे तेरा क्या है -१
https://www.maitrin.com/node/3254

तुझमे तेरा क्या है -२
https://www.maitrin.com/node/3257

तुझमे तेरा क्या है -३
https://www.maitrin.com/node/3289

तुझमे तेरा क्या है -४
https://www.maitrin.com/node/3306

तुझमे तेरा क्या है - ५
https://www.maitrin.com/node/3318

तुझमे तेरा क्या है - ६
https://www.maitrin.com/node/3460

तुझमे तेरा क्या है - ७
https://www.maitrin.com/node/3522

तुझमे तेरा क्या है - ८
https://www.maitrin.com/node/3711

तुझमे तेरा क्या है - ९
https://www.maitrin.com/node/3737

(कथा आजपासून पुन्हा वर्तमान काळात सुरु होत आहे. तुझमे तेरा क्या है च्या पहिल्या भागात मीरा ऑफिसच्या गेटवर उभी असते आणि तिला ज्या गोष्टी आठवतात त्या आत्तापर्यंतच्या भागात होत्या. आता पुढे सुरु.)

विचारांच्या तंद्रीत मी किती वेळ इथे अशी गेटवर उभी होते काय माहित. उशीर झालाय मीरा, तो भेटो अथवा नाही ऑफिसला तर तुला जायलाच हवं, भागवत सरांनी आपल्याला परत यायची इतकी गळ का घातली असेल? सहा महिने आधीपर्यंत परत इथे यायचा माझा काहीही प्लॅन नव्हता. सगळं सुरु झालं भागवत सरांच्या मेलपासून. त्यांनी ते रिटायर होणार आहेत म्हणून सांगितलं तेंव्हा मला आश्चर्यच वाटलं होतं. भागवत सर म्हणाले होते, “मी इथे नसणार आहे, मला माझ्यामागे इथे बेस्ट टीम असायला हवी आहे. आणि असंही तुझा प्रोजेक्ट संपून एक वर्ष होत आलंय तरीही तुझ्या रिक्वेस्टमुळे मी तुला तिथूनच काम करायला हरकत घेतली नाही पण नाऊ आय थिंक इट्स हाय टाइम टू कॅम बॅक मीरा”.
भागवत सरांचं म्हणणं मानून मी परत आले होते. चार वर्षांनी. पुन्हा तिथेच जिथून सगळं सुरु झालं होतं. जिथे मला मैत्री,प्रेम आणि प्रेमभंगाचं दु:खही मिळालं होतं तिथे.
ऑफिसमध्ये जाऊन मी भागवत सरांशी बोलले. ज्या प्रॅक्टिसमध्ये ट्रेनी म्हणून मी सुरुवात केली त्याची लीड म्हणून मी परत आले होते. त्याच्या जागेवर. तो कुठे होता, काय करत होता याची चौकशी करणं मी गेल्या चार वर्षात कटाक्षाने टाळलं होतं. त्यामुळे भागवत सरांनी त्याचं नाव काढताच मी सरळ विषय बदलला. त्यांना ते जाणवलं आणि ते हसले.
“इट्स ओके मीरा. आय विल नाॅट ओपन ऑल द कार्ड्स ॲट सेम टाइम. यु विल गेट टू नो सून.” असं म्हणून ते गेले.
काम लगेच सुरु कारण गरजेचं नाही असं त्यांनी सांगूनही मी माझं डोकं कामात खुपसलं.

दुपारी कॉफी घ्यायला कॅफेटेरियात गरल्यावर कोणीतरी आपल्याकडे बघतंय असं वाटलं म्हणून मी पाहिलं तर समोर निनाद होता. मी चेहरा फिरवला. मला बोलायचं नव्हतंच त्याच्याशी. त्या दिवशी जे झालं त्यानंतर तर नाहीच. मी कॉफी अर्धी ठेवून तशीच उठले. कॉफी कप ट्रॅशमध्ये टाकून डेस्कवर परत आले. इथला माझा परतीचा प्रवास काही सोपा होणार नव्हता तर.

संध्याकाळी सगळं काम आवरून लवकर निघावं असं डोक्यात होतं, त्यामुळे संध्याकाळची कॉफी जरा लवकरच घ्यायला गेले मी.
“हॅलो मैडम”
“अण्णा? हाय... हाऊ आर यू?“
“किती दिवसांनी दिसताय मैडम” अन्नाची अजून मैडम म्हणायची सवय गेली नव्हती. मला हसू आलं. अण्णाशी थोडा वेळ बोलून मी कॉफी घेऊन एक विंडो टेबल पकडून बसले.
कॉफी पिऊन निघाले सरळ घरी. डोकं दुखत होतं. भागवत सरांचं म्हणणं ऐकायला हवं होतं खरं तर. आज लगेच उगाच काम सुरु केलं असं एका क्षणासाठी वाटून गेलं मला.
पार्किंगकडे चालत निघाले होते तेव्हढ्यात मागून आवाज आला.
“मीरा?! हाय....”
आता कोण म्हणून मी मागे बघितलं तर छान ब्लॅक साडी घालून एक बाई उभी होती. ही... शर्वरी आहे??? तिच्या लांबसडक केसांमुळे मी तिला ओळखलं नाहीतर ओळखलंच नसतं.
मी काही न बोलता तशीच थांबले. निघून जावं का अशा विचारात.
“मीरा प्लीज... इतक्या वर्षांनीसुद्धा तू बोलणार नाहीयेस का माझ्याशी? अजून तुझा राग गेला नाहीये का? तू गेल्यावर कधीच कोणाशीच कॉन्टॅक्ट ठेवला नाहीस. माझं चुकलं मीरा. मी कित्ती मेल्स पाठवले तुला. तुझा फोन न जाणो किती वेळा ट्राय केला पण तू नाहीच उत्तर दिलस परत तर तुझा नंबरही बदलला. आपली मैत्री इतक्या सहज तोडून टाकलीस तू!”
“एक मिनिट! नसते आरोप ऐकून घेणार नाही मी. आपली मैत्री मी नाही तू तोडलीस त्या दिवशी. तुझा माझ्यावर काडीचाही विश्वास नव्हता हे तू सिद्ध केलंस तेंव्हा. त्यामुळे प्लीज मला दोष देऊ नकोस.”
“मीरा... आय ॲम साॅरी. माझी चूक मान्य आहे गं मला. मी तुझ्याशी जसं वागले त्यानंतर मी कित्येकदा तो दिवस आठवून दुःखी झाले आहे. माझी सर्वात चांगली मैत्रीण माझ्यापासून कायमची दुरावली. मला कधीच माफ करू शकणार नाहीस का? प्लीज मला माफ कर. तू गेल्यापासून आजपर्यंत खूप स्थित्यंतरातून गेलं माझं आयुष्य. माझं लग्न झालंय मीरा. मला एक मुलगा आहे. तुझी मैत्रीण शर्वरी जिला गाण्याची आवड होती, जी मनातलं सगळं पटकन बोलू शकायची, मी अजूनही तीच मुलगी आहे आणि मी जर तुला खरंच ओळखत असेन तर तू मला माफ करशील हे मला माहित आहे. चल बाय, तुझा जास्त वेळ घेत नाही. एन्जॉय युअर इव्हनिंग.” असं म्हणून शर्वरी गेलीसुद्धा.

शर्वरीच लग्न झालंय?! कोणाशी? निनाद? मी कुठे होते या सगळ्यात? पण यात माझी चूक नव्हती. त्या दोघांनी जे काही केलं त्याला फक्त रिऍक्ट झाले होते मी. हां आता माझ्या स्वभावामुळे मी ते भांडण, तो अबोला जास्त ताणला असेल पण सगळी चूक माझी नव्हतीच. जाऊदे. मी सरळ घरी निघून आले. आई बाबा मी परत आलेय म्हणून प्रचंड खुश होते. मी जायचा निर्णय जसा तडकाफडकी घेतला होता त्यामुळे त्यांना मी परत कायमसाठी येईन कि नाही अशी धास्ती वाटायची. ती भीती आता संपली होती. मी परत आले होते. आईच्या हातचं गरमागरम जेवण जेवून मी झोपायला माझ्या खोलीत आले. किती बरं वाटत होतं इथं. इथली माणसं माझी होती. दमल्यामुळे लगेच झोपी पण गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळी फोन वाजला. शर्वरीचा होता. तिच्या मुलाचा वाढदिवस होता दोन दिवसांनी त्यासाठी मला इन्व्हाईट करायला. मी बघू वगैरे म्हणून वेळ मारून नेली. मला अजूनही तिला माफ करायचा निर्णय घेता येत नव्हता. ऑफिसमध्ये काही विशेष काम नव्हतं. एकदोन प्रोजेक्ट्स चालू होते त्यांचा रिव्ह्यू घेत होते तर रवी आला. त्याच्याशी बोलून खरंच बरं वाटलं मला. इतक्या दिवसांनी कोणीतरी होतं ज्याच्याशी जुन्या गोष्टी न उगाळता मी बोलू शकत होते. दुपारी जेवायला कॅफेटेरियात गेले. जेवण सुरु करणार इतक्यात समोर निनाद येऊन बसला.
“एक मिनिट, तू उठायच्या आधीच बोलून घेतो. परवा निशांतचा वाढदिवस आहे. शर्वरीने तुला सांगितलंच असेल. प्लीज ये. बरच बोलायचंय तुझ्याशी. आम्हाला दोघांनाही.” एवढं म्हणून तो उठून गेला.
निनाद. माझा सगळ्यात जवळचा मित्र. तो त्या दिवशी आणि त्या आधीही जसं वागला तसं का वागला असेल या प्रश्नाने मला बरेच दिवस छळलं होतं. मी त्याच्या मुलाच्या वाढदिवसाला जायचं ठरवलं.
दोन दिवस काही खास झालं नाही. संध्याकाळी जरा लवकरच निघून मी घरी जाऊन आवरलं. आई बाबांना सांगितलं बाहेर एक कंपनी डिनर आहे त्याला जातेय आणि निघाले.
निनाद शर्वरीच्या घरी पोहोचले तर बाहेर अगदीच शुकशुकाट होता. पत्ता बरोबर आहे याची दोनदा खात्री करून मी बेल वाजवली. शर्वरीने दार उघडलं.
“ये ना”
मी आत गेले. आतही काहीच माहोल नव्हता वाढदिवसाचा.
“बैस ना” तिने पाणी आणलं. मी नको म्हणून थोडी अवघडूनच बसले.
“हाय” निनाद आला होता.
“निशांत कुठे आहे?” मी विचारलं.
“तो आत खेळतोय. तू खूप लवकर आलीयेस ग. अजून कोणीच आलं नाही. पण बरं झालं आपल्याला बोलायला मिळेल.” शर्वरी म्हणाली.
“..” मी नुसतीच गप्प.
“आय ॲम सॉरी मीरा.” निनादने बोलायला सुरुवात केली.
“आय डोन्ट नो व्हॉट आय वॉज थिंकिंग. आपण एकमेकांचे इतके चांगले मित्र होतो. त्या दिवशी मी जे काही बोललो वागलो, आय स्वेअर माझ्या मनात मैत्री सोडून दुसरी कुठली भावना नव्हती”
मी ऐकत होते त्याचं बोलणं चेहरा निर्विकार ठेवून.
“प्लीज बोल काहीतरी मीरा. मी तुझ्याबद्दल पझेसिव्ह झालो होतो. तू माझी मैत्रीण आहेस पण तुझ्या आयुष्यावर मला हक्क सांगता येणार नाही हे विसरलो होतो मी. चुकलं माझं मीरा. तुला मला माफ करता नाही का येणार?”

“माफ? निनाद! यू न्यू कि माझं अनिरुद्धवर प्रेम होतं तरीही तू त्या दिवशी त्याला सांगितलंस कि मीरा आणि माझ्यात मैत्रीपेक्षा जास्त काहीतरी आहे अँड शी नोज इट?! मी सर्वात पहिल्यांदा तुला सांगितलं होतं कि अनिरुद्ध मला आवडतो, आय लव्ह हिम. माझ्या आयुष्यातली सर्वात महत्वाची गोष्ट मी तुझ्यासोबत सगळ्यात आधी शेअर केली, अनिरुद्धला सांगायच्याही आधी. आणि तू काय केलंस? सतत त्याच्याबद्दल निगेटिव्ह बोलणं, त्याच्या आणि रागिणीच्या नात्याबद्दल शंका, ज्या पुढे जाऊन चुकीच्याही ठरल्या होत्या. तुला मला सुखात बघायचंच नव्हतं. आणि त्यात तुझा पझेसिव्हनेस! दॅट वाॅज माय फ्रेंड चेरी आॅन द टॉप! मी तुला कधी असं जाणवून दिलं होतं कि तू माझ्यासाठी मित्र सोडून काही आहेस? का असं वागलास?” माझा आवाज संतापाने चढला होता. इतक्या वर्षांनी आज पहिल्यांदाच जे झालं त्यावर आम्ही बोलत होतो.

“मी चुकलो मीरा. माझ्या डोक्यात काय चालू होतं काय माहित. मी शर्वरीवर खरंच प्रेम करत होतो, आजही करतो. पण अनिरुद्ध तुझ्या आयुष्यात आलेला बघून माझं तुझ्या आयुष्यातलं स्थान डळमळीत होईल असं का वाटलं मला, का यावर खरंच माझ्याकडे उत्तर नाहीये. मी जे वागलो आणि बोललो ते तसं नको व्हायला होतं. माझ्या मैत्रिणीच्या सुखात मी आनंद मानायला हवा होता हे मला आत्ता कळतंय, तेंव्हा माझी बुद्धी कुठे चरायला गेलेली कोणास ठाऊक?” आणि त्याला हसू आलं. शर्वरीही त्याच्या हसण्यात सामील झाली.
मला जास्त वेळ गंभीर असण्याचा मुखवटा धरून ठेवलं जमलं नाही.
“मलाही माफ कर मीरा. याच्या तशा वागण्यानं मला इनसिक्युअर वाटायला लागलं होतं. असं वाटायचं कि हि आधीच याची इतकी चांगली मैत्रीण आहे. देव न करो आणि याचं तिच्याविषयीचं मत खरंच बदललं आणि तो मला सोडून गेला तर? दॅट वाॅज प्युअर जेलसी. तुला त्याच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट माहित असायची. मला तुझी जागा हवी होती. पण तू त्याच्या आयुष्यात असतानाही माझी एक वेगळी जागा होतीच हे तेंव्हा लक्षातच आलं नाही.”
“हम्म... आणि म्हणून तू मला त्याच्या आयुष्यातून निघून जा म्हणालीस. आमचं मैत्रीचं नातं माझ्या बाजूने खरं आहे का असं विचारलंस. त्याला विचारायचं सोडून मला विचारलंस. मला कसं वाटेल याचा विचार केला नाहीस” शर्वरीला मी नेहमीच चांगली मैत्रीण मानलं होतं. हि गोड मुलगी माझ्याबद्दल इतकं मनात साठवून असेल असं मला खरंच वाटलं नव्हतं तेंव्हा.
“येस. आय वॉज ॲन ईडिअट! तू तिथून निघून गेल्यावर मला जाणवलं मी रागाच्या भरात किती उलटसुलट बोललेय. खूप पश्चात्ताप झाला पण वेळ निघून गेली होती. लगेच तुला फोन केलाही होता पण कुठल्या तोंडाने बोलणार त्यामुळे तू फोन उचलल्यावर कट केला. आय ॲम साॅरी मीरा.”
“मीरा आम्हाला दोघांनाही तुझी माफी मागायची होती. दुसऱ्या दिवशी आम्ही आलोही होतो तुझ्या घरी. पण तू घरी नव्हतीस, त्यानंतर एका आठवड्याने तू निघूनही गेलीस. आमच्या दोघांच्या नात्याची पहिली साक्षीदार होतीस तू. तुला गमावल्याचे दुःख नेहमीच डाचत राहिलं होतं आम्हाला. तू परत येणार आहेस हे भागवत सरांकडून कळालं, तेंव्हाच आम्ही दोघांनी ठरवलं होतं तुला भेटून सगळं सांगायचं. प्लीज आम्हाला माफ कर मीरा” निनाद बोलत होता.
त्या दोघांच्या डोळ्यात सच्चेपणा होता.
मी अजूनही गप्प होते. विचार करत होते त्यांच्या बोलण्याचा. खरंच त्या दिवशी जसं घडलं तसं घडलंच नसतं तर? कि अनिरुद्धपासून दूर जायचा माझा निर्णय आधीच झाला होता? त्या निर्णयाला या दोघांनी फक्त हातभार लावला?
माझं मन पुन्हा मागे गेलं.
“मीरा धिस इज ॲन अपाॅर्च्युनिटी ऑफ लाइफटाइम. प्लीज डोन्ट रुइन इट. मला वाटतं तू ऑनसाईट जावंस.” अनिरुद्ध सांगत होता.
याला मला इथं थांबू द्यायचं नाहीये का? त्याच्या मनात आहे तरी काय? इस ही कमिटमेंट फोबिक? ही हॅज सम फीलिंग्स अबाऊट मी हे त्यानेच मला सांगितलं होतं. आपल्या दोघांचं नातं फक्त मैत्री नाही हेही. पण मग मी ऑनसाईट जायलाच हवं हा हट्ट का?
“अनिरुद्ध मला नाही जायचं. आणि तू माझ्या आयुष्याचे डिसिजन्स नाही घेऊ शकत ओके?”
“का नाही जायचं तुला?”
“यु नो द रिझन.”
“हो. आय नो. इतकी टॅलेंटेड आहेस, इतके प्रोजेक्ट्स सहज हॅण्डल केलेयस तू. एका माणसाला आयुष्य वाहून स्वतःच करिअर पणाला लावणार आहेस का? इतकं स्वस्त नाहीये ते. तुला उगाच नाही इतकं सगळं शिकवलं, यु हॅव अ स्पार्क मीरा, प्लीज डोन्ट डू धिस टू युअरसेल्फ.”
“एका माणसाला आयुष्य वाहून? तो एक माणूस तू आहेस हे तुला माहित नाहीये का? हो! व्हायचंय मला एका ठिकाणी सेटल. तुझ्याबरोबर संसार थाटायचाय. इथंच राहायचंय. नाही मी एव्हढी महत्वाकांक्षी. नकोय मला अजून ग्रोथ. तुझा असा अट्टाहास का पण?” हे सगळं मला ओरडून त्याला सांगावं वाटत होतं पण मी नाही सांगितलं. त्यालाच मी नको असेन तर?

“मीरा... कुठे हरवलीस गं?” शर्वरी विचारत होती.
“अम्म... काही नाही. जुन्या गोष्टी आठवल्या.”
“मीरा आणखी एक गोष्ट. आधीच सॉरी त्यासाठी. आज निशांतचा वाढदिवस नाहीये, उद्या आहे. तो झोपलाय आत निवांत. आम्हाला तुझ्याशी बोलायचं होत म्हणून आम्ही तुला आजच बोलावलं. अर्थात उद्या पण बोलावणारच आहोत. सॉरी”
“मूर्खांनो .. नालायकांनो... पापी लोक... कुठे फेडाल रे हि पापं... छ्या... काय पण मित्र मिळालेत... एक गोष्ट सांगायला आणि माफी मागायला चार वर्षं घालवली. आणि आता पोराच्या नावाने पण खोटं बोलता का रे?” माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्या दोघांचेही डोळे पाण्याने भरले होते.
त्यानंतर पहाट होईपर्यंत अखंड बोलत होतो तिघे. इतक्या वर्षांच्या गोष्टी साठल्या होत्या मनात. काय बोलू आणि किती बोलू असं झालं होतं. काॅफी भरलेले मोठे मग्ज, आम्ही तिघे आणि गप्पा. आईला रात्रीच फोन करून मी शर्वरी आणि निनादकडे राहतेय म्हणून सांगितलं होतं.
सकाळी चहा घेत निशांतबरोबर गप्पा झाल्या. तो नुकताच उठला होता. किती गोड छोकरा होता तो. त्याला हॅपी बर्थडे विश केलं. शर्वरी आता दुसऱ्या कंपनीत जॉबला होती.
“चलो मी निघते. घरी जाऊन आवरून पुन्हा ऑफिसला जायचंय”
“हो पण संध्याकाळच्या निशांतच्या बर्थडे पार्टीचं विसरू नको.” निनादने आठवण करून दिली.
“येस्स! भेटू संध्याकाळी”
त्या तिघांना बाय म्हणून मी निघाले. खरंच फेअरीटेल्स डू कम ट्रू! किमान या घरात तरी परीकथा सत्यात अाली होती. त्यांनी नेहमी असंच आनंदी राहावं म्हणून देवाकडे प्रार्थना केली आणि निघाले.
क्रमश:

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle