तुझ्या इटूक देहाचे मुग्ध अथांगसे स्वर
माझ्या शब्दास धाडती अजाणसे गहिवर
तू बसता समोर तार होते ही कातर
पार होईना माझ्याने हे धिटूक अंतर
निरखता तुझा असा सानपंखी हा भरार
आक्रसल्या मना जडे मोह पंखांचा शारीर
नको नको देऊ अशी ही साद आरपार
मन लांघून देहास हरवेल नभापार