सोहळा

देही विरुन भोगावे देह मिलन सोहळे
तुझेमाझे एकोपावे काही नुरावे सोवळे

सारे गंध सारे श्वास कानी पडू नये गाज
अंगोपांगी लपेटावे स्पर्श थरार कोवळे

थोडी माया थोडे प्रेम काही स्मृतिचे विभ्रम
धावे देहसुखा मागे मन मोकाट आंधळे

देह चांदण गोंदण मन तांबडा निखार
डोरल्यात मिरवेन असे मोती नि पोवळे

वर
0 users have voted.