साहित्य :
अर्धी वाटी उडीद डाळ ,
अर्धी वाटी साबुदाणा,
एक वाटी जाड पोहे,
चार वाट्या तांदूळ,
पाव चमचा खाण्याचा सोडा,
पाव चमचा मेथी दाणे,
मीठ आणि भरपूर घरी केलेले लोणी.
कृती:
१. उडीद डाळ,साबुदाणा, मेथी दाणे व तांदूळ वेगवेगळे ५-६ तास भिजवणे.
२. वरील साहित्य बारीक वाटून घेणे. त्या आधी एक तास पोहे भिजवून तेही ह्या सोबत वाटताना मिक्स करावे.
३. ह्यात सोडा मिक्स करून परत ५-६ तास उबदार जागी ठेवणे.
४. आता मिश्रण मस्त फुलून आले असेल.
५. डोसा करण्यापूर्वी यात थोडेसे मीठ व पाणी घालून पातळ करुन घ्यावे.
६. तवा छान तापल्यावर नेहमीच्या डोश्यापेक्षा जरा जाडसर डोसे घालावे.
७. डोसा थोडासा कोरडा झाल्यावर त्यावर घरी केलेले लोणी पसरावे.
८. आता दुसरी बाजू पण भाजून घ्यावी.
९. डिश मध्ये काढून वरून परत लोणी घालावे.
तयार डोसा चटणी किंवा सांबर सोबत सर्व्ह करावा. ह्या प्रमाणात ५ जणांसाठी पोटभर डोसे होतात.
हिंदी / मराठी
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle