तरुण तुर्कांच्या देशात ४

तरुण तुर्कांच्या देशात १: https://www.maitrin.com/node/3918
तरुण तुर्कांच्या देशात २: https://www.maitrin.com/node/3922
तरुण तुर्कांच्या देशात ३: https://www.maitrin.com/node/3936

काल फारच फिराफिरी झाली होती. सुदैवाने (वा मी केलेल्यी प्लॅनिंगमुळे :P :P ) आज फार काही करायचे नव्हते. काल वेळेच्या गोंधळामुळे राहिलेली ब्ल्यु मॉस्क आज सकाळी बघायची होती आणि मग कप्पाडोकिआकडे प्रयाण.

ब्ल्यु मॉस्क सगळ्यांनाच पहायची होती हे खरं पण प्रत्येकाची उठायची वेळ, तयार व्हायला लागणारा वेळ आणि ब्ल्यु मॉस्कमधे असलेला इंटरेस्ट सगळचं वेगळं असल्याने य्यावेळी ब्ल्यु मॉस्कला प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार जावं असं कालच ठरलं होतं. फक्त सगळ्यांनी १० वाजता हॉटेलच्या लॉबीत परत यायचयं हे बाबांनी अगदी बजावुन सांगितलं होतं.

आई बाबा त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे सकाळी लवकरच ब्रेकफास्ट्ला गेले होते. आदल्या दिवशी मनजीत आमच्याबरोबर जेवायला न येता डायरेक्ट झोपुनच गेल्याने आणि अक्षय आमच्याबरोबर येउनही काहीच न जेवल्याने या दोघांना सकाळी भुकेने लवकरच जाग आली. मग आम्ही आधी ब्रेकफास्ट करुन घेउ आणि मग आवरु म्हणुन चौघं एकत्र ब्रेकफास्टला गेलो. स्गळ्यांनी एकत्र ब्रेकफास्ट केल्यावर आई बाबा ब्ल्यु मॉस्कला गेले आणि आम्ही आवरुन थोड्या वेळाने निघालो.

ब्लु मॉक्सची भव्य वास्तु ही आया सोफ्याच्या अगदी समोरच आहे. मधे मोठी जागा आहे आणि तिथे लोकांना बसायला मस्त जागा आहे.

96A451B5-0422-4225-A260-4B9177CDF2A0.jpeg

आत जाताना सगळ्या मुली/स्त्रिया यांनी डोकं झाकणं आवश्यक आहे. मुलांना मात्र असा नियम नाही. ते आपले
उघड्या डोक्याने आत जाउ शकतात. तिथे आत जाताना चपला/बुट बाहेरच काढावे लागतात पण गंमत म्हणजे ते बाहेर ठेवावे लागत नाहीत. मशिदित आत शिरण्याआधी जिथे आपण चपला काढतो तिथेच आपल्याला एक प्लॅस्टिकची पिशवी मिळते. त्यात आपले चपला/बुट ठेवायचे आणि मग ती पिशवी घेउन आत जायचं.

आम्ही तसेच आत गेलो.

नावाप्रमाणेच ब्लु मॉस्कमधे सगळीकडे निळ्या रंगाच्या विविध शेडच्या टाईल्स लावल्या आहेत. त्या बघुन डोळे अगदी निवतात. नाही म्हणायल लाल आणि पिवळा रंग आहे खरा पण त्याचा उपयोग निळ्या रंगाला अजुन खुलवायलाच.

D0D3BF1D-6B77-4269-9FE0-1E18B830BBFA.jpeg

भैरवीला तिथल्या टाईल्स इतक्या आवडल्या की तिने अक्षयकडे आपण आपल्या घरी अशाच टाईल्स लावु म्हणुन हट्ट सुरु केला. त्यावरुन अक्षय आणि मनजीतने तिची बर्याच वेळ बरीच खेचली. जामच चिडवलं बिचारीला. शेवटी कुठे अशी टाईल दिसली तर घरी विकत घेउन त्याचा शोपीस म्हणुन उपयोग करु यावर मांडवली झाली.

ब्लु मॉस्कमधे आम्हाला तसा फार काही वेळ लागला नाही. पुर्ण मशिद बघुन आम्ही एका कोपर्यात आलो तेव्हा तिथला एक माणुस इस्लामबद्दल सांगत होता. मला आता फार आठवत नाहीये पण त्याने ही पाचवेळा अजान का पढली जाते ते सांगितलं. तसच एक इंटरेस्टिंग गोष्ट कळली ती म्हणजे फक्त भल्या पहाटेच्या अजानमधे बाकीच्या अजानपेक्षा एक ओळ जास्त आहे. ती म्हणजे 'झोपेपेक्षा प्रार्थना केलेली चांगली'. ही ओळ मुळ अजानमधे नव्हती. एकदा एका अजान देणार्याला वाटलं की भल्या पहाटे लोकांचा अजानचा उत्साह जरा कमीच असतो. त्यामुळे त्याने आपल्या मनानेच ही ओळ वाढवली. मग ती धर्मगुरुंनाही पटली, आवडली आणि अशा रितीने ती पहाटेच्या अजानमधे आली.

आम्ही हे सगळ ऐकुन निघतच होतो, तेव्हढ्यात तिथल्या माणसाने आम्हाला कुठुन आलात असं विचारलं. भारत म्हणल्यावर तो दोन मिनिट म्हणुन कुठेतरी गेलाच. आला तो कुराणाची एक प्रत घेउन. ही तुमच्याकडे ठेवा असं सांगुन त्याने आम्हाला ती प्रत देउ केली. कोणत्या धर्माचा धर्मग्रंथ आपल्याकडे ठेवायचा तर आपल्याकडुन त्याचा व्यवस्थित आदर राखला गेला पाहिजे आणि सांभाळ करता आला पाहिजे हे भैरवी आणि माझं मत होतं. ते आमच्याकडुन होणं अवघड वाटत होतं म्हणुन आम्ही नम्रतेने त्याला नकार दिला आणि बाहेर आलो.

बाहेर आलो तर ही गर्दी उसळली होती. आपापले बुट घालुन झाल्यावर बघितलं तर भैरवी आणि अक्षय दिसेचना. त्या एव्हढ्या गर्दीत कुठे नाहीसे झाले काय माहित. आम्ही मग थोड इकडे तिकडे पाहिलं पण तरी ते काही दिसले नाहीत. बहुतेक ते गेले असतील असं म्हणुन मग आम्हीपण निघालो. तोपर्यंत दहा वाजायलाच आले होते. बाबा आता अस्वस्थपणे आमची लॉबीत वाट बघत असतील असं वाटुन मनजीत आणि मी लगबगीने हॉटेलकडे परत आलो. बघतो तर आई बाबा जवळच्या एका शॉपिंगच्या गल्लीतुन बाहेर पडताना दिसले. शेजारी असलेले मार्केट आईला गेले दोन दिवस खुणावतचं होतं. संधी मिळताच आई त्या गल्लीत घुसली होती.

यामुळे एक बरं झालं की आम्ही किती उशीरा आलो हे बाबांकडुन ऐकुन घ्यावं लागलं नाही. तेवढ्यात भैरवीचा फोन आलाच. ते बिचारे अजुन ब्लु मॉस्कच्या आवारतच आम्हाला शोधत बसले होते. मग त्यांना हॉटेलवर यायला सांगितल आणि आमचं सामान आवरायला खोलीत गेलो.

साधारण सव्वा दहाला आम्ही एअरपोर्टकडे जायला निघालो. इथे एक गोष्ट सांगायलाच पाहिजे की इथले सगळे टॅक्सी ड्रायव्हर हे अत्यंत निष्णात ड्रायव्हर आहेत. आम्ही जिथे रहात होतो ते इतक्या अरुंद गल्ल्यांच्या भागात होतं तरीही येताना आणि जाताना दोन्ही ड्रायव्हरने अत्यंत कुशलतेने तिथुन गाडी काढली.

ओरिजनल वेळेप्रमाणे आमची फ्लाईट आधी सव्वा वाजताची होती. ती प्रिपोन होउन एक वाजता झाल्याचा मेल काही दिवसंपुर्वी आला होता. आता एकची फ्लाईट म्हणजे पावणे बाराला पोचलो तरी चालतयं म्हणजे पावणे अकराला निघालो तरी आरामत पोचु असा आम्ही हिशोब केला होता. तरी बाबांच्या भितीपायी आम्ही सव्वा दहालाच निघालो होतो. म्हणजे सगळं सुरळीत व्हावं की नाही? पण नाही,तसं व्हायच नव्हतं.

एअरपोर्टच्या जवळ आल्यावर एकदम पोलीसांच्या गाड्या दिसायला लागल्या. एअरपोर्टला जाणारा रस्ता बंद केला होता. आपल्याकडे कोणी मंत्री येणार असतील तर कसं दृश्य दिसतं अगदी तसचं इथे दिसत होतं. मग आमच्या ड्रायव्हरने पर्यायी रस्ता घेउन आम्हाला एअरपोर्टला सोडलं. यामुळे झालं काय की त्याने आम्हाला डिपार्चरला सोडल्च नाही. खाली जिथे प्रवाश्यांना पिक करतात तिथे सोडलं. मग तिथुन डोमॅस्टिक एअरपोर्ट शोधुन तिथे जायला आम्हाला बराच वेळ लागला. कसबसे डोमॅस्टिक एअरपोर्टवर पोचतोय तर आत जायच्या दारातच ही भली मोठी रांग. बरं काल गडबडीत आम्ही वेबचेकइन करायला विसरलो होतो हे आता समोरची रांग बघुन लक्षात आलं.

बरं रांग पटपट पुढे सरकेल तर शप्पत. दारातच का एव्हढी मोठी रांग असावी हा विचार करतच थोडं पुढे आलो तर कळलं की दारातच सामानाची सिक्युरिटी आहे. म्हणलं अरे वा, इथे आधी सिक्युरिटी मग बॅगेज देणं असं दिसतयं. सिक्युरिटी करुन बॅगेज द्यायच्या काउंटरवर आलो तर फ्लाईट आता पाउणची आहे असं दाखवत होते. अर्रे चाललयं काय? ही अशी अचानक काहीही पुर्वसुचना न देताअशी काय फ्लाईट प्रिपोन करतात? कदाचित आम्हाला मेल आला असावा पण तो आम्ही काही बघितला नव्हता. थोड टर्किश एअरलाइनवर चिडत, थोडं स्वतावर चिडतं आम्ही काउंटरपाशी पोचलो. आता यावेळेपर्यंत बारा पाच झाले होत. साडेबाराचं बोर्डिंग होतं. समोरचं काउंटर हे फ्लाइट निघण्याच्या एक तास आधी बंद होइल असं मॉनिटरवर दाखवत होते. म्हणलं आता बॅग घेतायत का बुडली आपली फ्लाईट.

पण त्या काउंटरवरच्या माणसाला हे काही नविन नसावं. सहा जणांच्या सहा बॅगा विमानाच्या पोटात द्यायच्या होत्या. त्या माणसाने मग शांतपणे प्रत्येक बॅगेच वजन करुन त्या घेतल्या आणि बोर्डिंग पास आमच्या हातात पडे पर्यंत बारा वीस झाले होते. आम्हाला असं वाटलेलं की आधी दारातच सिक्युरेटी झालेली असल्याने, त्यामुळे आता परत काही सिक्युरिटी नसेल. पण इथे परत सिक्युरिटी होती. दोन दोनवेळा सिक्युरिटी? बापरे. तेव्हा टर्कीला जाणार्या मुलींनी लक्षात ठेवा, की इथे एअरपोर्टवर दोन वेळा सिक्युरिटी असते. एकदा सुरवातीला पुर्ण सामानासकट आणि मग नेहमीची.

नेहमीच्या मर्फीज लॉप्रमाणे घाई झालेली असताना आपल्या विमानाचं गेट हे सगळ्यात शेवटचं आणि दुर असतं. त्याच प्रमाणे आमच्या विमानचं गेटही पार दुसर्या टोकाला होतं. भैरवी, अक्षय आणि मनजीत पळतच पुढे गेले. आईही त्यामानाने भरभर चालत गेली. बांबांच्या हातात आमची खाउची पिशवी होती. काल फार कोणी खाउ न खाल्याने ती बरीच जड होती. मग ती पिशवी मी घेतली आणि बाबांना पुढे जायला सांगितलं.

आम्ही गेटावर पोचलो तोपर्यंत सगळी माणसं ऑलरेडी विमानात स्थानापन्न झाली होती. आम्ही जेव्हा विमानात शिरलो तेव्हा सगळे आमच्याकडे हे कोण इतक्या उशिरा येणारे लोकं या नजरेने बघत होते. आम्ही आमच्या सीटवर बसेपर्यंत अजुन एक कुटुंब विमानात शिरत होतं. आमच्याकडे बघत असलेल्या नजरा आता नविन उशिराने आलेल्या कुटुंबावर रोखल्या गेल्या होत्या.

गंमत म्हणजे यावेळी बाबा, मनजीत आणि अक्षय यांना एकत्र सीटस मिळाल्या होत्या तर पुढच्या रांगेत आम्हाला तिघींना सीटस मिळाल्या होत्या. आम्ही बसल्या बसल्या आपल्याला खुप भुक लागली आहे ही जाणीव झालीच. एकुणात या गडबडीत फारच कष्ट झाले होते. Whew Heehee बसल्या बसल्या केळ्याच्या वेफर्सचा पुडा उघडला गेला. वेफर्स मगुन पुढे होत राहिले. यासगळ्यात विमानाने कधी उड्डान केल ते कळलही नाही. हा साधारण एक सव्वा तासाचा प्रवास होता. थोड्यावेळाने एअरहॉटेसची खाणं पिणं द्यायची गडबड सुरु झाली. ही इंटर्नल फ्लाईट असल्याने काही खायला मिळे ही अपेक्षाच आम्हाला नव्हती. अर्थात व्हेज मिळण्याची :uhoh: शक्यता फारच धुसर असल्याने तसही आम्हाला काही फायदा नव्हताचं. एकदा विचारुन बघु म्हणुन एअरहॉस्टेस जवळ आल्यावर विचारलं तर चक्क चीज सँडविच आहे हे उत्तर मिळालं Dancing Dancing

छान कुरकुरीत गरम गरम चीज सॅडविचवर मग आयरनच्या सोबत ताव मारला.

खाउन होतयं तोपर्यंत कायसेरी एअरपोर्ट आल्याची घोषणा झालीच. खाली उतरुन बाहेर आलो तोपर्यंत डायव्हर आलाच होता. कायसेरी एअरपोर्टवरुन कप्पाडोकिआ हे साधारण साठ-पासष्ट किलोमिटरवर आहे. तासाभरात आपण आरामात पोचतो. गाडीत बसल्यावर मग बाबांनी रिटायरमेंटनंतर काय कराव, घरच्या गप्पा कम गॉसिप, आमच्या दोघींच्या लहानपणाच्या आठवणी, आम्ही दोघी कशा आळशी आहोत अशा अनेक स्टेशनवर गप्पांची गाडी फिरली.

मग अचानकच कप्पाडोकिआचे ते टिपिकल लँडस्लेप आणि डोंगर दिसु लागले. ते बघुनच आम्ही आता आपलं हॉटेल कधी येतयं याची वाट बघत बसलो. इथे जी काही हॉटेलस आहेत त्यातली बहुतेक सगळी नैसर्गीक का मानवनिर्मीत गुहेत (म्हणजे डोंगर नैसर्गीकच, पण गुहा हॉटेलसाठी बनवलेली) वा डाँगरात आहेत. ते बघुनच आईने आपण असं गुहेत रहायचं हे एकदम उतरलेल्या चेहर्याने विचारलं. तिला आणि मनजीतला हे असां गुहेत्/डोंगरात रहाण फारसं पचनी पडलं नव्हतं. मग आम्ही सगळ्यांनी त्यांना हा कसा वन ऑफ अ काईंड अनुभव आहे, बघाच तुम्ही तुम्हाला आवडेल असं लेक्चर दिलं.

भैरवीने मला इकडे पिडायला सुरवात केलीच होती की तु नीट हॉटेल बुक केल आहेस ना, आत्तापर्यंत दिसलेली काही हॉटेल्स मस्त तर काही बाहेरुनतरी बोर दिसणारी होती.मग एखाद बोर दिसणारं हॉट्ल गेलं की ही विचारायही की आपलं ह्यापेक्षा बरं असेल ना म्हणुन. आता मी काय आधी तिथे जाउन आले होते का?  106 मीसुद्धा इंटरनेट वर बघुनच सुचवलं होतं ना.. पण उगीच आपलं.

आता मुख्य शहराचा आणि मार्केटचा एरिआ मागे पडला आणि आमची गाडी एक टेकडी चढायला लागली. आईला टेंशन की संध्याकाळी मार्केटला जायचं तर किती चालावं लागेल. त्याला किती वेळ लागेल. असा विचार करता करता आमच हॉटेल आलचं. ते बघुनच भैरवीने गाडीतच एक टुणकन उडी मारली. तिथुन खालचा आख्खा कपाडोकिआ गावाचा अप्रतीम व्हु दिसत होता.

गाडीतुन बाहेर पडल्यापडल्या पहिल्यांदा आम्हाला जाणवली ती थंडी. आमच्याकडे मला आणि आईला थंडी खुप आवडते तर भैरवी आणि मनजीतला जितकी थंडी असेल त्याहुन जास्त थंडी वाजते. त्यामुळे गाडीतुन बाहेर पडल्यावर भैरवी कुडकुडलीच.
या हॉटेलला वरच एक टेरेससारखी जागा होती. जिथे मस्त बसायला जागा होती. अगदी लोड तक्केही होते.

रिसेप्शनला गेल्यावर तिथल्या माणसाने आम्हाला न्युज दिली की तीन खोल्यांपैकी दोन वर आणि एक खाली आहे. आता तीन खोल्यांचं बुकिंग एकत्र केलं असताना अशा वेगवेगळ्या ठिकाणी का बरं त्याने आम्हाला खोल्या द्याव्या? पण आम्ही ज्या स्टँडड खोल्यांचे बुकिंग केल होतं त्या पुर्ण हॉटेलमधे फक्त तीनच होत्या आणि त्यातल्या दोन वर आणि एक खाली होती. आता खाली म्हणजे आम्हाला वाटल एखाद मजला खाली असेल म्हणुन मग आम्ही त्या रुममधे जातो असं सांगुन टाकलं. भैरवी बिचारी, तुम्ही वरच्या रुममधे रहा, आम्ही दोघ खालच्या रुममधे जाउ असं सांगत होती पण मनजीतने त्यागाची स्पर्धा जिंकत आम्हीच जातो असं ठरवुन टाकलं.

मग तिथल्या एका पोर्याने आमची मोठी बॅग घेतली, आम्ही छोटी घेतली आणि आम्ही खाली जायला निघालो. हे पुर्ण हॉटेल टेकडीवर उतरतं वसवलं आहे. त्यामुळे इथे नेहमीसारखे मजले हा प्रकारच नव्हता. प्रत्येक लेव्हलवर आम्ही प्रत्येक खोलीकडे आम्ही ही आमची खोली असेल या आशाळभुत नजरेने बघायचो आणि ही आपली खोली नाहिये हे हॉटेलचा कर्मचारी आम्हाला सांगायचा. असं करत करत आम्ही टेकडीच्या पायथ्याशी आलो. आणि या पायथ्याशी आमची खोली होती. म्हणजे वरुन दिसणारा सुंदर नजारा आम्हाला दिसणारच नव्हता. :phbt: Sad खोली मात्र मस्तच होती.

मनजीतला कधी एकदा वर जाउन टेरेसवर बसतोय असं झालं होतं.
आम्ही लगेच जरा फ्रेश होउन वर गेलो. जाताना पायर्‍या मोजल्या तर १०५ पायर्‍या होत्या. रोज (म्हणजे पुढचा दीड दिवस ) दोन तीनदा जरी वर खाली करायच म्हणलं तरी छान व्यायाम होणार होता पण घामही फुटणार होता. आम्ही वर येईपर्यंत बाकीची मंडळी तयार होउन आलीच होती. भैरवी फुल जर्कीन, टोपी असं सग्ळं घालुन आली होती :haahaa: :haahaa: .

अरे हो, एक सांगायचचं राहिलं. आम्ही उद्या सकाळी जी हॉट एअर बलुन राईड करणार होतो, त्या लोकांनी बुकिंगच्या मेलमधे लिहिलं होतं की आदल्या दिवशी तुमच्या हॉटेलात फॅक्स येइल. ते तुम्ही हॉटेलला विचारुन घ्या. तो फॅक्स येइल का नाही याच बाबांना आधीपासुनच टेंशन होतं, आणि भित्यापाठी ब्रम्हराक्षस म्हणुन तसा फॅक्स आलाच नव्हता. बाबांचा जीव अगदीच टांगणीला लागला होता. एकतर हा पुर्ण ट्रीपचा हायलाईट होता आणि पुर्ण ट्रीपमधला सगळ्यात महागडा आयटम होता. त्यामुळे बाबा आल्यापासुन दिलेलेया नंबरवर फोन करायचा प्रयत्न करत होते.

आम्ही सगळे टेरेसावर मस्त पहुडलो. खाली पुर्ण गावाचं भारी दृष्य दिसत होतं.

4A3F5C40-A928-4C31-A8DD-0C30AD2C3A64.jpeg

अशा हवेत मग चाय तो बनताही हे. म्हणुन मला, आईला आणि बाबांना मस्त चहा मागवला, मनजीत आणि अक्षयने हॉट चॉकलेट मागवलं. भैरवीने स्वताचा दीडतांदुळ वेगळा ठेवत कॉफी मागवली. त्याबरोबर खायला फ्राईज आणि चीज भरलेला तुर्कीश पराठा (ग्योझ्लेमे)मागवला आणि त्या वातावरणाची मजा घेत बसुन राहिलो.

F0569271-8271-4452-B13E-B9C0A54839B1.jpeg

बिचारे बाबा आता भारतातल्या ट्रॅव्हल एजंटला फोन लावत होते. मग ट्रॅव्हल एजंटने मी चौकशी करुन एक दीड तासात सांगतो म्हणल्यावर् ते थोडे शांत बसले.

आता दोन दिवस तुर्की जेवण जेवुन काही मंडळी वैतागली होती, त्यांच्यासाठी आज भारतीय रेस्टाँरंटमधे जायचा प्लॅन होता. इथे असणार्या भारतीय रेस्टॉरंटला चांगल रेटिंगही होतं.

आज संध्याकाळी मार्केटमधे जाउन शॉपिंग वा विंडोशॉपिंग करण्याचा आणि जेवायला जायचा प्लॅन होता. सुर्यास्त झाल्यावर त्याचे डोंगरावर पडणारे वेगवेगळे रंग बघुन तृप्त होउन आम्ही खाली मार्केटमधे जायला निघालो. आता हे हॉटेल टेकडीवर उतरत असल्याने आणि आमची रुम पायथ्याला असल्याने आमच्या खोलीतुन बाहेर पडलं की लगेच पाच मिनिटात मार्केट होतं. आधी आम्हाला जी भिती वाटली होती की बरच चालुन जाव लागेल तसं काही नव्हतं, फक्त ही टेकडी उतरायची होती.

मग मार्केटमधे जाताना वाटेतच आमची खोली लागल्याने तिथे एक छोटा ब्रेक झाला. आमची खोली खाली असली तरी जास्त छाने यावर बाकीच्या चौघांचं एकमत झालं. तेव्हढचं आमच्या मनाला थोड समाधान मिळालं.

आता मार्केटबद्दल सांगायचं तर हा परिसर प्रामुख्याने तीन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. एक म्हण्जे हॉट एअर बलुन राईड, तिथे मिळणारे खास मौल्यवान दगड आणि सिरॅमिक. त्यामुळॅ त्यासंदर्भातील गोष्टींची मार्केटमधे रेलचेल होती. सुरवातीलाच आम्ही बलुनच्या दुकानात शिरलो.सगळ्यांनीच तिथुन छोट्या छोट्या एअर बलुनच्या प्रतिकृती घेतल्या.

3C9DD3DB-4D8D-44C7-B651-8DDE1B1F0B31.jpeg

नंतर सिरॅमिकच्या दुकानात उगीच चक्कर टाकली. सिरॅमिकचं काही पुर्ण ट्रीपभर वागवणं काही शक्य नव्हतं म्हणुन घेतल काही नाही. अर्थात भैरवी तिच्या निळ्या टाईलच्या शोधात होतीच. पण तिलाही बहुतेक मनाप्रमाणे दिसली नसावी.

9A58CDE5-E232-420F-9DFB-12C0483E317D.jpeg

आम्ही बर्याच वेळ बर्याच दुकानात फिरत असल्याने एकीकडे बाबांच ब्लड प्रेशर वाढत होतं. तसं त्यांना अजुन उद्याच्या राईडबद्द्ल नक्की कळलं नव्हतच. त्यामुळे बिचारे ते त्याच खटपटीत होते. त्यांच्या मते आता आम्ही जेवायला जायला पाहिजे होतं. बुकिंगच्या मेलमधे राईडवाले उद्या सकाळी ४ वाजता हॉटेलमधे पिक करायला येणार आहेत असं लिहिलं होतं. खर तर हिवाळ्यात सव्वा सातला सुर्योदय होणार होता, मग ४ ला पिक करण्यात काय पॉईंट होता काय माहित. आमचं मत होतं की लिहिलेलं उन्हाळ्यासाठी होतं, उद्या राईडवाले उशीरा पिक करतील. बाबांना लॉजिकली जरी ते पटत असलं तरी आपण लवकर जेवुन, लवकर झोपाव अशीच त्यांची इच्छा होती. म्हणुन मग शेवटी आम्ही ठरलेल्या इंडिअन रेस्टॉरंटला गेलो.

जाता जाता मनजीत आणि अक्षयला ए टी व्ही बाईक्स दिसल्या. मग या दोघांच उद्या ए टी व्ही राईड करता येइल का याची चाचपणी सुरु झाली. यात प्रॉब्लेम असा होता की बलुन राईड झाली की आमची दिवसभराची गाईडसकट कप्पडोकिआ दर्शन राईड होती. सकाळी ९ ते ६ अशी त्याची वेळ होती आणि ए टी व्ही राइड साडे चार ते सहा होती. पण आधी चौकशी तर करु मग उद्या पुढच पुढे पाहु असं म्हणुन मनजीत आणि अक्षय आम्हाला रेस्टॉरंटला सोडुन या राईडची चौकशी करण्यात गेले.

आम्ही रेस्टॉरंटला गेल्यावर कळलं की आज त्यांच्याकडे मोठी ऑर्डर होती, त्यामुळे थांबाव लागणार होतं. मग काय, आम्ही थांबलो. तेवढ्यात ज्या मोठ्या गृपची ऑर्डर होती, तो गृप आलाच. कोणत्यातरी कंपनी आणि त्यांचे सेल्स एजंट असा गृप असावा बहुतेक. कारण ते लोकं ज्यांनी चांगला सेल्स केलाय त्यांना बक्षिसं वाटतं होते. त्यांचं सग्ळा प्रॉग्रॅम बघण्यात मस्त वेळ गेला. तेव्हढ्यात बाबांना ट्रॅव्हल एजंटचा फोन आला आणि उद्याची राईड पक्की असुन राईडवाला सहाला घ्यायला येइल असं त्याने सांगितलं. बाबांचा जीव एकदाचा भांड्यात पडला.

तेव्हढ्यात मनजीत आणि अक्षय सगळी चौकशी करुन आलेच. त्यांनी आल्यावर त्यांची ऑर्डर दिली. तिथलं जेवण छानच होतं. किंवा बर्याच दिवसांनी भारतीय जेवण जेवल्याने तसं वाटलं असेल, काय सांगावं?

आता परत जाण्यासाठी गुगलबाबाला साकडं घातलं तर त्याने वरचा टेकडीचाच रस्ता सांगायला सुरवात केली. काही केल्या तो खालचा रस्ता दाखवेचना. हॉटेलमधुन बाहेर पडुन रेस्टॉरंटला जाताना आम्ही खरं तर सगळे लँडमार्क्स बघुन ठेवले होते. पण आयत्यावेळी ते आठवतील तर शप्पत.

मग तसच टेकडी चढुन हॉटेलपाशी गेलो. या चढाचा बाबांना त्रास होइल का अशी जरा भिती होती पण सुदैवाने तसं काही झालं नाही. मग जरा आई बाबांच्या खोलीत बसुन थोड्या गप्पा मारल्या, वरुन आंधारतलं कप्पाडोकिआ बघितलं आणि खाली खोलीत आलो.

43EAB377-C385-450A-AE30-AEB6C16FF2AC.jpeg

उद्या बलुन राईड आणि कप्पाडोकिआ दर्शन, पुर्ण ट्रीपचा हायलाईट असलेला दिवस. अपेक्ष्रेला उद्याचा दिवस खरा उतरेल का नाही याचा विचार करतच, उद्या लवकर उठायचय या प्रेशरखाली झोपलो.

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle