आज हॉट एअर बलुन राईडसाठी सगळेच फार एक्सायटेड होते. मला आणि आईला उंचीची थोडी भिती वाटत असल्याने आम्हाला नाही म्हणलं तरी थोडं दडपण आलं होतं पण तरीही हा लाईफ टाईम एक्पिरिअन्स आहे, तो चुकवु नका असं बर्याच लोकंकडुन ऐकलं होतं.
काल फारच फिराफिरी झाली होती. सुदैवाने (वा मी केलेल्यी प्लॅनिंगमुळे :P :P ) आज फार काही करायचे नव्हते. काल वेळेच्या गोंधळामुळे राहिलेली ब्ल्यु मॉस्क आज सकाळी बघायची होती आणि मग कप्पाडोकिआकडे प्रयाण.
दुसर्या दिवशी वेळेवर उठुन, आवरुन मग ब्रेकफास्टला गेलो. मस्त कॉन्टिनेंटल ब्रेकफास्टचा स्प्रेड होता. विविध ब्रेड, चीज, बटर, जॅम, लेट्युस, टोमॅटो, काकडी, ऑलिव्ह्स, अंडी व नॉनव्हेज खाणार्यांसाठी त्याचे वेगवेगळे प्रकार, तुर्कीश चहा, कॉफी, ज्युस. असा ब्रेकफास्ट केला की माझा दिवस छान जातो. आपापल्या आवडीने सगळ्यांनी ब्रेकफास्ट केला.
गुरुवारी रात्री सगळे एकतर झोपणारच नाहीत वा कमी झोपले असतील हे गृहित धरुन तसही शुक्रवारी संध्याकाळी बोस्फोरस बोट टुअर करणे आणि इस्तंबुलचा फील घेणे एवढाच प्लॅन होता. त्यामुळे आई बाबांची फक्त बोट टुअर मिस होणार होती. ती त्यांना नंतर करता येणारच होती.
साधारण सहा-साडेसहा वर्षांपुर्वी आई माझ्याकडे टर्किश एअरलाईन्सने आली होती. तेव्हाच येता जाता तिने वरुन इस्तंबुल पाहिलं आणि ती इस्तंबुलच्या प्रेमातच पडली. अर्थातच तेव्हा ती फक्त ट्रान्झिटमधे असल्याने तिने इस्तंबुलचं दर्शन फक्त वरुनच घेतलं होतं. आपण कधीतरी टर्कीला जायला पाहिजे असं तिने ठरवलं होतं. नंतर एक दोन वर्षाने 'झी जिंदगी'वर कोणतीतरी टर्किश सिरिअल सुरु झाली. आई अगदी न चुकता ती सिरिअल बघायची. आधी घेतलेलं इस्तंबुलच दर्शन आणि ही सिरिअल यामुळे आईच्या बकेटलिस्टमधे टर्की फारच वरच्या नंबरला जाउन बसलं होतं.
आज सकाळी लवकर उठायचे ठरवूनच बाहेर पडलो. रात्री परत येताना जवळच्या मार्केटमधून सोबत ब्रेड बटर केळी घेऊनच आलो होतो. त्यामुळे पटापट रुमवरच नाश्ता केला आणि निघालो. आज घाई करायची होती कारण आजचे पहिलेच ठिकाण होते हजारो वर्षापासून उभे असलेले इस्तंबूलमधले गुलाबी ऐश्वर्य ..हागिया सोफिया. हे म्युझियम कम चर्च कम मशीद बघायला कमीत कमी तीन तास लागतात. शिवाय त्याच्या समोरच प्रसिद्ध ब्लु माॅस्क आणि तिच्यामागे इस्तंबूलचे रोमनकालिन अवशेष हिप्पोड्रोम आहेत.
अपार्टमेंटमधून बाहेर पडलो ते तक्सिम स्क्वेअरमध्येच आलो इतका जवळ हा शहराचा महत्त्वाचा भाग होता. तक्सिम स्क्वेअरमध्येच तुर्कस्थानच्या लाडक्या राष्ट्रपित्याच्या आतातुर्क केमाल पाशाचे स्मारक बांधलेले आहे. एका बाजूने राष्ट्रकर्तव्यदक्ष आतातूर्क आणि त्याचे साथीदार तर दुसर्या बाजूला लष्करी वेषात आपले संरक्षण कर्तव्य पार पाडणारा आतातुर्क आणि लष्करातले त्याचे सोबती असे तुर्की जनतेच्या या लाडक्या नेत्याचे शिल्पस्मारक आहे. इथूनच इस्तिकलाल कादेसी या पूर्णपणे पादचारी हॅपनिंग रस्त्यावर जायचा मार्ग सुरु होतो.