अंतर असतच सदैव
माझ्या तुझ्यात
एकमेकांत अडकलेल्या
कोणत्याही दोन जीवात
दोघांच्या श्वासात
स्वप्न सत्यात
स्पर्शाच्या आठवात
घट्ट मिठीच्याही अवकाशात
ओठात ओठ देतानाच्या थरारात
किंवा अगदी आरपार रीतं होतानाच्या क्षणातही
मुद्दा इतकाचे
कि हे अंतर
ओढ वाढवतय
कि ,
असो.
१२ जानेवारी २०२० रात्रौ ९.४०