महालक्ष्मी सरस २०२० प्रदर्शन या शुक्रवारी सुरू झाले.
एम एम आर डी ए मैदान बी के सी, बांद्रा इस्ट ह्या ठिकाणी हे भव्य प्रदर्शन आयोजित केले आहे. प्रदर्शन फारच मोठे व अगदी नीट संयोजित केलेले असे आहे. सध्या मुंबईचे हवामान आल्हाददायक असे असल्याने प्रदर्शनात भटकणे, खरेदी व खादाडी चा मौका चुकवू नका. भारतातील सर्व राज्यांतील व राज्यातील अनेक जिल्ह्यातील अल्प बचत गट व सेल्फ हेल्प गट आणि सोसाय ट्या इथे अनेक प्रकारच्या वस्तू, कपडे, हस्तकला वस्तू व खाण्याचे पदार्थ घेउन हजर आहेत.
प्रदर्शन सकाळी दहा ते रात्री दहा आहे. व रात्रीस काही कलाकारांचे पर्फॉरमन्सेस पण आहेत. रात्री गर्दी पण जास्त असेल. आज रविवार असल्याने एकदम सुट्टीचा माहौल होता व मैत्रिणींचे गृप, फॅमिलीज बारकी मुले ते ज्येना असे सर्व इथे खरेदीचा व खादाडीचा आनंद लुटत होते. मी उबर करून साडेअकराच्या सुमारास पोहोचले. एक्सिटच्या बाजूलाच भले मोठे कार पार्किन्ग आहे.
प्रदर्शनाला प्र्वेश फुकट आहे. व आत जाताना बॅग चेक करावी लागते. आत गेल्यावर समोरच डाव्या बाजूस भले मोठे फूड पॅराडाइज असे लिहिलेले फूड कोर्ट आहे. व प्रदर्शनाची सुरुवात आहे. चार ते पाच रोज आहेत व नंतर उजवी
कडे सर्व रो संपल्यावर मागच्या बाजूस स्वच्छतागृहांची सोय आहे. प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित सूचना लिहीलेल्या आहेत.
मी शेवटाकडून सुरुवात करून मग फुड पॅराडाइज कडे जायचे ठरवले कारण एकदा पोट भरले की चालायचा उत्साह
खलास होउन जातो. शेवटचे तीन रोज जास्त करून कपडे, हस्तकला वस्तू व भांडिकुंडी, दागिने आहेत व पहिले दोन रोज अन्न पदार्थ, आपले कोकण मटेरिअल चे स्टोल वगैरे मामला आहे.
शेवटाच्या रो मध्ये छत्तिस गड, उत्तरांचल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश च्या साड्या, मण्यांचे दागिने, विणलेले वस्तु प्रकार, स्टोल ह्या बरोबरच, घाणीवरचे तेल ( हे ठाण्या चेच लोक आहेत मी ह्यांचा पत्ता घेतला आहे.) शेंगदाणा तेल,
बदाम आक्रोड व इतर तेले लाकडी घाण्यावर कोल्ड प्रेस्ड पद्धतीने काढलेली आहेत. मी बदामाचे तेल घेतले. ह्यात कोणते ही सॉल्व्हंट नाही, व प्रिझर्वेटिव पण नाही. हे अँटि एजिन्ग आहे. म्हनूण घेतले. फेस मसाज साठी वापरेन.
साड्यांमध्ये इंडिगो ब्लॉक प्रिंट्स, सिल्क व कॉटन मिक्स आहेत. पोपटी, रस्ट क्रीम असे कलर्स आहेत. मला एक दम गुलाबी व यल्लो साड्या हव्या होत्या. त्या पुढे भेटल्या. टेरा कोटा बीड चे दागिने, भरलेल्या पर्सेस कलमकारी साड्या, घरी घालायचे गाउन,
तांब्या पितळेची भांडी, मातीची दही लावायची उभट भांडी, गॅस वर ठेवायची खास शेपची भांडी, दगडी जाती, खलबत्ते, पाटा वरवंटे, दिवे आहेत.
लाकडी खेळणी, उदबत्त्या व धूप, अश्या सामानाचे स्टॉल आहेत. मग पुढे जाउन मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशचे
बेडशीट्स कवर्स क्विल्ट आहेत. आंध्रा तेलंग णाचे इकत मटेरिअल व साड्यांचे आहेत. एक कांचिपुर म सिल्क साड्यंचा पण आहे. बरेच मटेरिअल आहे. डोळे फिरतात .
राजस्थानचे स्टॉल आहेतच कपडे, घागरे, शरारे कार्पेट्स, काळी भक्कम विणलेली कांबळी व फ्लोअर कवरिंग सतरंज्या आहेत. ह्यात सर्व रंग आहेत .वॉर्म व कोल्ड. निळे पिरोजी, ऑरेंज रस्ट व चॉकोलेटी आहेत.
मिझोरामच्या ड्रेसचा व सामनाचा एक स्टॉल आहे पण इथे फारसे कोणी थांबत नव्हते. लहान मुलांचे जॅकेट छान होते इथे व बेल्ट.
मधल्या रो मध्ये मध्यभागी एका चौकात वेस्ट बंगालचे साड्या फॅब्रिकचे स्टॉल आहेत ते बेस्ट आहेत. बालुचेरी साडी व इतर साड्या अनेक प्रकारच्या आहेत. साबित्री सेल्फ हेल्प गट ह्यांच्या स्टॉल वर साजेसे फॅन्सी दागिने आहेत. मेटल व बिड वर्क. मोठ मोठ्या साइजचे. त्या साड्या व दागिने असा एक लुक बनवता येइल. इथे एक साडी आवडलेली पण २५०० रु ला महाग वाट ली. कदाचित नेक्स्ट वीकेंड जाउन घेउन येइन असली तर.
ऑरगॅनिक धान्याचे, तळणाच्या सामानाचे, तिखट हळ द पाव डरी, च ट ण्या, मसाले, बिस्कि टे, बासुंदी, लाडू लो णची ह्यांचे भरपूर स्टॉल आहेत. सांगलीचे भडंग आहे. सेंद्रिय गुळाच्या ढेपी आहेत.
ह्या सर्व भागात चालताना जमिनीवर जाड सतंरंज्या घातलेल्या आहेत तरीही खालचा सर्फेस अन इव्हन असल्याने पाय घसरायचा किंवा धडपडायचा चान्स आहे. जेना व मुलांना संभाळून न्या.
फूड कोर्ट ची जमीन सतर रंजी व वर प्लास्टिक कव्ह रिंग आहे. फूड कोर्ट मध्ये स्पेस्ड आउट व्हेज व नॉनव्हेज सेपरेट प्लस चहा ची काउंटरस आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय स्वस्तातली सोय आ हे. मी घरून पाणी नेले होते त्यामुळे पाच रु मध्ये बाटली परत भरून मिळाली. हात धुण्या साठी बेसिन्स आहेत. एकदम घरगुती लग्नाच्या जेवणाचा माहौल आहे. व सर्व फारच एंजॉय करत होते.
अमेझिंग फू ड इज अव्हेलेबल. घरून नक्की डबे टिफिन्स घेउन पार्सले घेउन या. मी आज व्हेज फारसे फिरकलेच नाही. पण हुरड्याचे थालिपीठ, दही धपाटे, भाकर्या वांग्याचे भरीत होते. छोले भटुरे चहा हे पण होते. नॉन व्हेज मध्ये सावजी चिकन मटन सुक्के चा स्टॉल आहे. कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा, फिश फ्राय कोंबडी वडे उपलब्ध आहे. मी इतका चॉइस बघून पारच गोंधळून गेले. व शेव्टी गोव्याचा एक स्टॉल आहे. तिथून राइस व फिश करी थाली घेतली. २०० रु मध्ये प्रॉन करी, राइस सोल कढी. एक स्वीट खिरीसारखा पदार्थ. बांगडा तळलेला एक पीस,
स्लाड असे होते. प्लस मी एक तुकडा सुरमई फ्राय घेतला. एकदम सुपर्ब जेवण. सर्व टेबले भरलेली होती लार्ज गृप्स नी. मग उभ्या उभ्याच जेवले आरामत. तेव्ढ्यात ताजा तळलेला पाँफ्रेट आला मग तो व सुरमईचे दोन तुकडे अजून घेतले. एकदम खास गोवन चव. चिकन शागुती पण होते. व चिकन ६५ पण. नुसती सोल कढी २० र ला होती. तिथे पुस्तकात अभिप्राय देउन आले. स्टोलवालीचे गोवन अगत्य अगदी सुखद आहे. स्वीट लेडी.
यावेळी चांगली सोयम्हणजे बिग बझार सारख्या ट्रॉली उपलब्ध आहेत. शॉपर्स च्या सोयींचा खूप विचार केलेला आहे.
व स्वच्छतेचे ध्या न ठेवले आहे. स्वच्छता गृहात घाण करू नये, फूड स्टॉल मधे स्वैपाकी व सर्वर स्टाफ ने केसांवर कव्हर टोपी घालणे बंधन कारक आहे अश्या सूचना होत होत्या. स्टॉल धारकांसाठी पण नीट इन्फ्रा उपलब्ध आहे फोन केला की इलेक्ट्रिशिअन व इतर सेवा स्टॉल पाशी उपलब्ध आहेत. एकदम प्लेझंट अनुभव.
मेडिकल इमर्जन्सी साठी अँब्युलन्स व फायर फायटिं ग ट्रक, पोलिस यंत्रणा तिथेच उपलब्ध व कार्यरत पण आहेत.
बाहेर जायच्या मार्गावर एक दोन स्टॉल आहेत. फार्म टु टेबल माल विकतात. तसेच इंद्रायणी व इतर लोकल वाणाचे तांदूळ कडधान्ये उपलब्ध आहेत.
मग मी उबर करून परत. सेंट्रल साइड च्या लोकांसाठी रिलायन्स जिओ वर्ल्ड सेंटर, व वन बीकेसी ( बेंक ऑफ अमेरि का ऑफिस) वरून पुढे आले की एक नवा फ्लायओव्हर झाला आहे. तिथून परत या म्हणजे वेळ पण कमी लागतो व कुर्ल्याचा ट्राफिक व मचमच अवोइड करता येते. दोन्ही वेळा उबर सर्विस उत्तम पाच मिनिटात गाडी हजर. चालक गप चुप व नीट चालव णारे. उत्तम अनुभव.
आता फोटो फोन वरून अपलोड करते. हॅपी शॉपिन्ग.