(हेम-पंचदशी-काव्य)
माझी लेखणी — —
माझी लेखणी
सामान्य चार चौघी समान
गुणवती ती
हरेक रुपी मिळवी मान~~
मूळ अक्षरे
पाटीवर गिरवली छान
शुध्दलेखना
खाऊन मार, दुखलाऽ कान ~~
शिस पेन्सिल
अखंड तासा, पाडा फडशा
कलम दौत
सांडा शाई, रंगवा फरशा ~~
' बोरु 'नावाची
लेखणी' सुलेख ' आले बाई
नवी लेखणी
पिई शाई, शिंपण्याची घाई ~~
नवलाईची
नवी लेखणी अधुनिका हो!
नाविन्यपूर्ण
रंग-ढंग ' वापरा-फेका ' हो ~~
लेखणीची या
सोबत ऐसी जीवनभर
लेखणी विना
अशक्य! मुरली खोलवर ~~
टंक लेखनी
झालीय जीवनधारा आज
तिची सोबत
' शब्द अंतरीचे 'चढे साज ~~
चित्र लेखणी
शाई दौतीची साथ तिजला
स्फूर्तिदायिनी
पंख स्पर्श जागवी मजला ~~
~~~~~~~~~~~~~
विजया केळकर______