सुमारे ५० वर्षांपासून अमेरिकेत अनेक मराठी लोक आले आणि इथे स्थायिक झाले .
अमेरिकेत येऊन स्थिर स्थावर झाल्यावर , आपल्या मुलांना भारताशी नाळ जोडून ठेवण्याकरता , मातृभाषेची ओळख करून देण्याची गरज वाटायला लागली आणि मराठी शाळांना सुरुवात झाली. ऐकून आश्चर्य वाटेल पण अमेरिकेतल्या जवळजवळ प्रत्येक राज्यात अशा मराठी शाळा चालतात , न्यू जर्सी सारख्या भारतीय लोकसंख्या जास्ती असलेल्या भागात तर अश्या शाळांची संख्या आणि येथील विद्यार्थी संख्या हि भरपूर आहे. इथे शिकवणारे सगळे शिक्षक आपली नोकरी आणि व्यवसाय सांभाळून या शाळांमध्ये स्वेच्छेने विनामूल्य शिकवण्याचे काम करतात.
अमेरिकेत जन्मलेल्या मुलांना , घरात मराठी बोलणारे पालक असले तरी शाळेत आणि बाहेर इतर ठिकाणी इंग्लिशच असल्यामुळे मराठी बोलणं कठीण जात.
आपल्या मुलांबरोबरच जवळपासच्या इतर मराठी मुलांना या भाषेची गोडी लागण्याकरता , श्री. सुधीर आणि सौ. प्रज्ञा आंबेकर यांनी १९८६ साली आपल्या मित्रांच्या मदतीने ,न्यू जर्सी मधील एका शहरात मराठी शाळा सुरु केली . या अमेरिकन - भारतीय मुलांना मराठी शिकवण्यासाठी काय विशेष प्रयत्न करावे लागले ? ऐकुया त्यांच्याच शब्दात ... बरोबरीनेच शाळेतील मुले , त्यांचे पालक आणि शिक्षकांशी गप्पा या विशेष व्हिडिओ मध्ये.. https://youtu.be/fNm8FBNaMcY.
Keywords:
कलाकृती:
ImageUpload:
