सुमारे ५० वर्षांपासून अमेरिकेत अनेक मराठी लोक आले आणि इथे स्थायिक झाले .
अमेरिकेत येऊन स्थिर स्थावर झाल्यावर , आपल्या मुलांना भारताशी नाळ जोडून ठेवण्याकरता , मातृभाषेची ओळख करून देण्याची गरज वाटायला लागली आणि मराठी शाळांना सुरुवात झाली. ऐकून आश्चर्य वाटेल पण अमेरिकेतल्या जवळजवळ प्रत्येक राज्यात अशा मराठी शाळा चालतात , न्यू जर्सी सारख्या भारतीय लोकसंख्या जास्ती असलेल्या भागात तर अश्या शाळांची संख्या आणि येथील विद्यार्थी संख्या हि भरपूर आहे. इथे शिकवणारे सगळे शिक्षक आपली नोकरी आणि व्यवसाय सांभाळून या शाळांमध्ये स्वेच्छेने विनामूल्य शिकवण्याचे काम करतात.