अभ्यास हा शाळेत शिकवण्याची आणि कंटाळा करण्याची गोष्ट आहे असा एक एकूण सूर दिसतो ना आपल्याकडे? बडबडगीते, बालगीते सुद्धा अभ्यासाला अगदी दुष्ट ठरवतात, शाळेला वाईट अस लेबल लावून टाकतात. आता एवढी नकारात्मक तयारी झाल्यावर बऱ्याच जणांचा शाळा आणि अभ्यास अगदी नावडीचा झाला तर काय नवल?
मग आपल्याला याबद्दल काय करता येईल असा शोध घेतल्यावर जाणवलं कि अभ्यासाला अभ्यास हे नावं न देता खेळासारख रूप दिलं तर कदाचित मुलांना ते आवडेल. अर्थातच हे काही माझं संशोधन नाही. इंटरनेटवर केलेल्या शोधाच मला समजलेलं सार समजा हव तर. त्या नुसार आपल्याला काय करता येईल असाही विचार केला. मग जाणवलं कि अगदी लहान असतानाच खेळताना गोष्टीची कारणं शोधायची सवय लावली, माहिती शोधायची आवड लावली तर अशा गोष्टींची आवड मुळातूनच निर्माण होईल आणि नंतर अभ्यास हा परीक्षेपुरता न राहता काहीतरी नवीन शिकण्यासाठी करायचा असा विचार होईल.
आता या सगळ्या गोष्टी प्रूव्ह करायला माझ्याकडे काही आधार वगरे नाही. पण अशा गोष्टी करून तरी पाहाव्या या उद्देशाने घरी काही गोष्टी करते. ते खेळ इथेही कुणाला उपयोगी येतील या उद्देशाने इथे संकलन करतेय.
अर्थातच तुम्ही असे काही प्रयोग , गंमती करत असाल तर ती माहिती तुमच्याकडूनही इथे आली तर हा प्रयोग खऱ्या अर्थाने बहरेल. तुमच्या प्रयोगाची माहिती देताना मी खाली दिलेला साचा वापरलात तर माहिती वापरणे आणि शोधणे सोप्पी जाईल. काही खेळ / प्रयोग अगदीच सोप्पे वगरे वाटतील पण लहान मुलांसाठी ते फारचं गमतीशीर असतात असा अनुभव आहे.
या मालिकेच चे नावं "मज्जाखेळ"
स्वरूप:
एका प्रकारच्या खेळासाठी एक धागा. त्याचे थोडेसे व्हेरिएशन असतील तर त्याचं धाग्याच्या प्रतिसादामध्ये लिहिता येतील. पण फार फरक असतील तर नवीन धागा काढूयात.
-----------याच मालिकेत नविन धागा काढताना --------------
धाग्याच नावं: मज्जाखेळ [वयोगट]:खेळाचे नावं
वयोगट:
[१-३][३-५][५-७][७-१०]असे ठरवा. १० वर्षाच्या पुढेही कोणी काही प्रयोग / खेळ करत असेल तर लिहिले तरी हरकत नाही.
उदा:
मज्जाखेळ [३-५]: वाफेचे पाणी
थोडी सुरुवातीची माहिती
वयोगट:
साहित्य:
कृती:
अधिक टिपा:असल्यास
मुलांनी विचारलेले प्रश्न आणि त्यांची पालकांनी दिलेली उत्तरे: असल्यास
-----------------------------------------
यामध्ये काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सुचवा. त्याप्रमाणे करता येतील. मी पहिला मज्जाखेळ टाकतेय इथे. तो पाहून साधारण स्वरूप कळेल.