काहीतरी नवीन करून पाहायचं आहे आणि मुलांच्या सर्जनशीलतेला वाव द्यायचा आहे तर मग त्यांना ऑनलाइन अनिमेशन व्हिडियो बनवायला सांगू शकता.
मुलांची स्वतःची कल्पना , स्वतःच किंवा मित्रमैत्रिणीच स्क्रिप्ट आणि त्यानुसार ऑनलाइन अनिमेशन मुव्ही बनवता येते.
मुलांचा व्हिडीओ झाला की तुम्ही
Http://www.digitaljatra.com वर
जाऊन त्यांची प्रवेशिका पाठवू शकता. आणि तो व्हिडीओ व्हॉटसअप वर पाठवू शकता.
विषय - कोरोना आणि मी
भाषा - मराठी , हिंदी, English किंवा मुकपटही चालेल.
व्हिडीओ सिलेक्ट झाल्यास बक्षीस देखील आहे.
उजवा मेंदूत कल्पनाशक्तीम सॄजनशीलता, एकाच वेळी परिस्थितीचं आकलन ह्या क्षमता आहे. कलात्मकता, चाकोरी बाहेरचा विचार, भावनिक बुद्धीमत्ता ही त्याची गुणवैशिष्ट्ये.
डावा मेंदू हा तर्कसंगत विचार करणारा, वाचन, लेखन, शिस्त, नियोजन, आकलन हया सगळ्या क्षमता आहे.
ह्या खेळाने दोन्ही मेंदूच्या क्षमता वाढवण्यासाठी केलेला व्यायाम.
साहित्य: कागद, पेन
कृती:
अ ब क ड
गाव घर कुत्रा खुर्ची
झाड रस्ता मडकं कपडे
विहीर दुकान पेन तबला
दगड शेतकरी बूट बल्ब
जेव्हा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तेव्हा पाऊस कसा पडतो असा एक प्रश्न घरी विचारला जातो. गेले अनेक दिवस मी "वाफ वर जाते, मग थंड झाली कि पाऊस पडतो" वगरे थोडक्यात सांगत होते.
परवा चहा प्यायला बसले आणि परत हाच प्रश्न आला. त्यावेळी दाखवलेला हा पिटुकला प्रयोग.
वयोगट: [३-५]
साहित्य:
कुठलीही गरम वाफाळणारी वस्तू , चहा, दुध, वरण काहीही.
एक थंड स्टीलचा पेला / चमचा
कृती:
-चहा कसा गरम आहे, त्यातून कशा वाफा येत आहेत ते सांगा.
-मग स्टीलचा पेला कसा थंड आहे ते हात लाऊन दाखवा
-आता पेला वाफेवर १ ते २ मिनिट पकडा किंवा झाकून ठेवला तरी चालेल.
हा खेळ मी इथल्या लेकीच्या डे केअर मधे पाहिला. तिथे दर आठवड्याला एकदा अर्धा पाऊण तास यासाठी ठरलेला असतो. आम्ही घरी अजुन तरी कधी खेळलेलो नाही पण एकुणात मलाच खुप मजा येते पहायला. खरतर मी तीला घ्यायला जाते तेव्हा नुकतीच याची सुरुवात झालेली असते. मग मी पुर्णवेळ थांबुन बघते. शक्य होईल तेव्हा असे घरी खेळायचे आहे. इथे माझ्या नोट्स साठी टाकतेय. पण इथेही कुणाला करुन बघता येईल. साधारण संगित खुर्ची सारखेच पण अजुन जास्त प्रकार आहेत.
कुणाला अजुन काही प्रयोग करायचे असतील, गंमती इथे देण्यासारख्या असतील तर इथे नक्की द्या.
अभ्यास हा शाळेत शिकवण्याची आणि कंटाळा करण्याची गोष्ट आहे असा एक एकूण सूर दिसतो ना आपल्याकडे? बडबडगीते, बालगीते सुद्धा अभ्यासाला अगदी दुष्ट ठरवतात, शाळेला वाईट अस लेबल लावून टाकतात. आता एवढी नकारात्मक तयारी झाल्यावर बऱ्याच जणांचा शाळा आणि अभ्यास अगदी नावडीचा झाला तर काय नवल?