मज्जाखेळ [3-5]/[5-7]: ताल/ ठेक्यांचा खेळ

हा खेळ मी इथल्या लेकीच्या डे केअर मधे पाहिला. तिथे दर आठवड्याला एकदा अर्धा पाऊण तास यासाठी ठरलेला असतो. आम्ही घरी अजुन तरी कधी खेळलेलो नाही पण एकुणात मलाच खुप मजा येते पहायला. खरतर मी तीला घ्यायला जाते तेव्हा नुकतीच याची सुरुवात झालेली असते. मग मी पुर्णवेळ थांबुन बघते. शक्य होईल तेव्हा असे घरी खेळायचे आहे. इथे माझ्या नोट्स साठी टाकतेय. पण इथेही कुणाला करुन बघता येईल. साधारण संगित खुर्ची सारखेच पण अजुन जास्त प्रकार आहेत.
कुणाला अजुन काही प्रयोग करायचे असतील, गंमती इथे देण्यासारख्या असतील तर इथे नक्की द्या.

साहित्य- ऑप्शनलच आहे - ताल ठेक्याची वाद्य ( castanets, tambourine, wrist bell, triangle and striker, डफली, बेल, टाळ, ड्रम, खुळखुळा असे लहान मुलांचे काहीही, अगदीच नसेल तर वाटी चमचा, देवाची घंटा सुद्धा चालेल) मोठ्यांसाठी शक्य असेल तर कुठलेही एक वाद्य जसे पियानो, किबोर्ड, गिटार, तबला इ.

खेळ #१ -

खेळासाठी काही नियम ठरवलेले आहेत ( हे आपण आपल्या सोयीने ठरवु शकतो)
( एकाच गाण्याचा ठेका वाढवुन, कमी करुन इत्यादी)
१- धावण्यासाठी एका ठराविक प्रकारचा ताल ( जसे जोरात वाजवणे)
२- साधे चालण्यासाठी नेहेमीच्या तालातले संगित
३- अगदी हळुहळु चालण्यासाठी खुप हळु वाजणारे संगित
४- दिशा बदलण्यासाठी एक ठराविक संगित
५- स्किपिंग करत चालण्यासाठी एखादा उडता ठेका
(अजुन असे नियम करता येतील)

मग शिक्षकांनी / मोठ्या कुणी एकापाठोपाठ एक असे संगित वाजवायचे. आणि मुलं गोलाकार धावणार/ चालणार/स्किपिंग करणार. प्रत्येक बदलाबरोबर मुलांची अ‍ॅक्शनही बदलली पाहिजे. दिशा बदलण्याचे संगित वाजल्यावर गोल चालतानाची दिशा बदलली पाहिजे.

खेळ #२ -
मुलांना वेगवेगळी ताल वाद्ये देऊन एका गाण्यावर ठराविक शब्दांवर ताल देण्यास सांगावे. मुलांचे दोन ग्रुप करुन एका ग्रुप ला एका शब्दावर आणि दुसर्‍या ग्रुपला दुसर्‍या शब्दावर असेही सांगता येईल.

खेळ #३ -
प्रत्येकी सात सुरांसाठी वेगवेगळी अ‍ॅक्शन ठरवावी. जसे सा साठी उभे , रे साठी टाळी इ.
आणि तो तो सुर वाजवल्यावर / गायल्यावर मुलांनी ती अ‍ॅक्शन करायची

खेळ #४ -
संगित खुर्ची सारखेच- गाणे थांबले कि जोडी जोडी करुन उभे राहायचे.

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle