मज्जाखेळ[३-५]: वाफेचे पाणी

जेव्हा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तेव्हा पाऊस कसा पडतो असा एक प्रश्न घरी विचारला जातो. गेले अनेक दिवस मी "वाफ वर जाते, मग थंड झाली कि पाऊस पडतो" वगरे थोडक्यात सांगत होते.
परवा चहा प्यायला बसले आणि परत हाच प्रश्न आला. त्यावेळी दाखवलेला हा पिटुकला प्रयोग.

वयोगट: [३-५]

साहित्य:
कुठलीही गरम वाफाळणारी वस्तू , चहा, दुध, वरण काहीही.
एक थंड स्टीलचा पेला / चमचा

कृती:
-चहा कसा गरम आहे, त्यातून कशा वाफा येत आहेत ते सांगा.
-मग स्टीलचा पेला कसा थंड आहे ते हात लाऊन दाखवा
-आता पेला वाफेवर १ ते २ मिनिट पकडा किंवा झाकून ठेवला तरी चालेल.
-पेल्यावर जमणार्‍या वाफेचे पाण्याच्या थेंबात होणारे रुपांतर दाखवून मग नीट स्पष्टीकरण देता येईल.

काळजी:
गरम चहा/ दुधात बाळ हात घालणार नाही याची काळजी घ्यालच

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle