मज्जाखेळ[३-१०]: गोष्टी बनवा

वयोगट: कोणीही खेळू शकते.

उजवा मेंदूत कल्पनाशक्तीम सॄजनशीलता, एकाच वेळी परिस्थितीचं आकलन ह्या क्षमता आहे. कलात्मकता, चाकोरी बाहेरचा विचार, भावनिक बुद्धीमत्ता ही त्याची गुणवैशिष्ट्ये.
डावा मेंदू हा तर्कसंगत विचार करणारा, वाचन, लेखन, शिस्त, नियोजन, आकलन हया सगळ्या क्षमता आहे.
ह्या खेळाने दोन्ही मेंदूच्या क्षमता वाढवण्यासाठी केलेला व्यायाम.

साहित्य: कागद, पेन

कृती:
अ ब क ड
गाव घर कुत्रा खुर्ची
झाड रस्ता मडकं कपडे
विहीर दुकान पेन तबला
दगड शेतकरी बूट बल्ब

अ, ब, क, ड ह्या स्तंभापैकी अ स्तंभातला कुठलाही शब्द ध्यायचा आणि त्या संकल्पनेला धरून गोष्ट बनवायला सुरवात करायची. ३-४ वाक्यानंतर दुस-याने मधेच थांबवून ब स्तंभातला कुठलाही शब्द ध्यायचा आणि त्या संकल्पनेला धरून अगोदरची गोष्ट बरोबर जुळवायची. असे सगळे शब्द संपेपर्यंत करत राहायचं (किंवा कंटाळा येईतोवर). या प्रयोगामुळे कल्पनाशक्तीचा विकास होतो.

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle