सगळ्यांनाच आता पर्यंत समजल असेल कि यापुढे आपल्याला करोना सोबत वाटचाल करावी लागणार आहे. अगदी लॉकडाऊन संपल्यावर सुध्दा करोना ठोस उपचार उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपल्या सोबत असणार आहे.
आपले नेहमीचे PPE (personal protection equipment) आपणं वापरतो आहोत च पण त्याव्यतिरिक्त ही काही गोष्टी आहेत ज्या आपण सगळ्यांनी आपापल्या आयुष्याचा एक भाग म्हणून अंगीकारले पाहिजे. आता ते काय हे पाहुयात :
पौष्टिक आहार :- पौष्टिक आहार म्हणजे काय ? तर साधी सोपी व्याख्या म्हणजे भारतीय आहार पद्धतीचा अवलंब करणे. आपली आहार संस्कृती इतकी परीपुर्ण आहे कि घरातील उपलब्ध अन्नधान्यापासुन अनेक प्रकारचे पौष्टिक पदार्थ बनतात. (आणि त्यात आपल्या सुगरणीचा वेगवेगळे पदार्थ करण्यात पारंगत आहेतच) .
गमतीचा भाग सोडला तर यातही
* अती तेलकट, तुपकट पदार्थ प्रामुख्याने टाळावे. ( अगदींच खवय्यांनी निदान अती सेवन तरी टाळावे. )
* थंड पदार्थ खाणे ( आईस्क्रीम, कुल्फी वगैरे), थंड पाणी, कोल्ड्रिंक्स पिणे टाळून कोमट पाणी, लिंबू सरबत, ऊसाचा रस,(बर्फा शिवाय) यांचा समावेश करावा.
* मिठाच्या पाण्याने रोज सकाळी आणि झोपण्यापूर्वी कोमट पाणी आणि मिठ यांने गुळण्या कराव्यात.
* चहामध्ये चहा मासाला बनवून तो वापरावा. (चहा मासाला :- ३ टेबल-स्पून लवंग, १/४ कप वेलची, १ १/२ कप काळी मिरी, २ टुकड़े दालचिनी, १/४ कप सुंठ, १ टी-स्पून जायफल पावडर), किंवा आलं एक लहान तुकडा चहामध्ये वापरावा.
* हळदीचा चहा, हळदीच दुध यांचे सेवन दिवसातून एकदा तरी करावे.
* दिवसातून एकदा १/२ लसूण पाकळ्या नुसत्या खाव्या किंवा चटण्याकरून सेवन करावे)
आपली रोगप्रतिकारक शक्ति वाढवण्यासाठी आपणच प्रयत्न करुया, चला करोनाशी लढुया.
@ सौ सानिका सुर्वे