वार्‍याची झुळूक

~~~~~~~~~~~~~~
वार्‍याची झुळूक
~~~~~~~~~~~~~
वार्‍याची झुळूक मंद हळूवार
मळभ जावे, मन सावरे
जाता स्पर्शून तनमनावर
वाजू लागावे नवे घुमारे ~~~

अंधारात काजव्यानं चमकावे
शब्दांना सहज कवेत घ्यावे
वाटे भरारीसवे गगनात जावे
वार्‍याच्या झुळूकीने कुजबुजावे ~~~

गाण्याची तान, सूर संगीत झंकार
ऐकावा स्वर गीतात हुंकार
छुमछुम तोरडीतून मकार
वार्‍याच्या झुळुकीनं होई साकार ~~~

वार्‍याच्या झुळुकीवर जणू
बालकाचे निर्मळ हास्य नाचावे
मयुरपंखी स्पर्शे मायेनं हो
जखमेवर मलमची व्हावे~~~

बहु दिसांनी येणार येणार साजण
खिडकीशी 'ती' उभी, वाट पहावी
आवडत्या सुगंधानं देण्या वर्दी
वार्‍याचीच झुळूक बागडत यावी ~~~

तगमग थांबेना,सावलीतही
रणरणते ऊन,काहिली-काहिली
चमत्कार !पानांची स्तब्धता भंगली
गाऽर वार्‍याची झुळूक वाहिली ~~~

विजया केळकर_______

कविता: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle