किती पहायचे ऋतू
पावसाने भिजलेले?
पाणी मुरलेले खोल
तरी मन तहानले!
ओल्या मातीचा भरला
आसमंती दरवळ
एका सुखाच्या कुपीत
धुंद वेडा परिमळ
किती सुखावले जरी
गार वाऱ्याच्या झोतात
जागी असते मनात
उष्ण श्वासांची सोबत..
सुप्रिया
किती पहायचे ऋतू
पावसाने भिजलेले?
पाणी मुरलेले खोल
तरी मन तहानले!
ओल्या मातीचा भरला
आसमंती दरवळ
एका सुखाच्या कुपीत
धुंद वेडा परिमळ
किती सुखावले जरी
गार वाऱ्याच्या झोतात
जागी असते मनात
उष्ण श्वासांची सोबत..
सुप्रिया