आले गेले वाटसरू ते नवीन होते
जुनेच रस्ते शोधण्यात पण रमले होते
मीच एकटी आयुष्याच्या प्रवासात या
वाट वेगळ्या वळणाची धुंडाळत होते
मस्त मजेने चालत असता कळले नाही
वाट बिकट ती धरून पुरती फसले होते
थकल्या नंतर वळता पाठी जाणवले की
दरीत काळोख्या मी पार अडकले होते
सुप्रिया