ती आतुरलेली, व्याकुळ होती धरती,
तो बरसुन गेला घन ओथंबुन वरती
कण कणात भिनले थेंब टपोरे ओले,
मातीत उधळले अत्तर भरले प्याले
ती धुंद, तृप्त तरि आसुसलेली अजुनी!
तो पुन्हा पुन्हा घन बरसुन जाई फिरुनी
ही प्रीत विलक्षण! असा निरंतर खेळ
हिरवळ अंथरतो, गगन धरेचा मेळ ..
सुप्रिया