सोबत
त्यांची सोबत म्हणजे
एक खंबीर आधार
एक संरक्षक ढाल
कोणत्याही परिस्थितीचा झेलण्या वार
त्यांची सोबत म्हणजे
एक काटेरी कुंपण
सुखदु:खांस सम्मानपूर्वक जपणं
मजबूत विश्वासाची गुंफण
त्यांची सोबत म्हणजे
साक्षात् नैसर्गिक उपचार
विनामूल्य रोग्याची सेवा
असाध्य रोगाचाही घ्यावा समाचार
त्यांची सोबत म्हणजे
रोज संध्याकाळी फिरणं
जमेल तसा बाजार करणं
आल्याबरोबर चहापान करणं
त्यांची सोबत म्हणजे
'टाईम्स आॅफ इंडिया' हाती
पदार्थातील कोथिंबिरीवर प्रिती
ओठांवर अन्नपूर्णेची स्तुती
त्यांची सोबत म्हणजे
एकोणपन्नास वर्षांचा सहवास
घड्याळाशी मैत्री खास
अचानक ....सोबतीविना प्रवास
विजया केळकर_______
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle