नववर्ष स्वागत
जाऊ देना मला
वाजले की बारा
ऐकून ढोल ताशे
जीव होई घाबरा
आज मध्यरात्री वचन देते तुला
फिरुनी नाही येणार भेटायला
घड्याळ-काटे एकरुप या क्षणाला
विलग होतील पुढच्या क्षणाला
नवाच उद्भवलाअसाध्य रोग
संस्कार थोरांचे होते वाचवाया
पिडिले बहु, परि जिवित राखाया
आकांक्षा सर्वे संतु निरामया
उद्यमी बनविले घर बसल्या
कामधंदा बसवून छंद जोपासला
रसनातृप्ती शरीरसंपदा साधत
यात्रा-सहलींचा खर्च वाचविला
माझ्या मनी नसे किंतु,परंतु
तूही नको बुरे-भले चिंतू
जे शक्य ते दिधले, हेच सत्य
जाण बा,क्षमा करी माझा मंतु
नव्याचे कर स्वागत सहर्षे
जीव ओतून रमावेस
भावभावनांचा खेळ साध उत्कर्षे
नवतेजे उजळून निघावेस
विजया केळकर______