नेमेचि येतो मग पानगळ ऋतु हे खरं असलं तरी पानगळीआधी उधळणारे ते रंग बघणे हा दरवर्षी एक सोहळा असतो. लाल,पिवळा, केशरी असे जणू वणवा पेटल्यासारखे रंग निसर्ग उधळतो. कितीदा बघितलं तरी मन भरत नाही असं ते निसर्गाचं रूप, डोळ्यात, मनात सर्व ठवू तेवढं थोडंच. अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो अक्षुंने- असं होऊन जातं.
अमेरिकेचा पूर्व किनारा या रंगपंचमी करीता प्रसिद्ध आहेच. पण पश्चिम किनाऱ्यावर इथल्या भागातही ही जादू थोड्या प्रमाणात दिसते. यंदा या फॉलच्या काळात काही छान ट्रेक्स केले आणि ही रंगांची लयलूट अनुभवली. त्याची फोटोरूपी सैर करवते.
खास लार्चेस बघायला हा हाईक केला. घरापासून तीन तासांवर असलेल्या नॅशनल पार्क मध्ये हा हाईक आहे. सकाळी ४ ला घरून निघालो. पण सगळे कष्ट सार्थकी लागले.
चढणावर पूर्ण वेळ एका बाजूला हा छोटासा लेक दिसत होता. त्यातलं ते मधलं अगदी ओवल शेप बेट फारच गोड दिसत होतं.
आजूबाजूला डोंगरावर लाल वणवा पेटलेला अगदी.
पण या वणव्यातून वाट काढत पुढे गेलो.
वर जाऊ लागलो तसे समोरच्या डोंगरावर वरती असलेले लार्चेस दिसायला लागले.
आजूबाजूला बर्फाच्छादित पर्वत दिसत होतेच.
पायवाट
वर-वर गेलो तसे चढ जास्तच स्टीप होत गेला पण त्याचबरोबर आता लार्चेस जवळून दिसू लागले.
हा लूप ट्रेल असल्याने आलो त्याच मार्गाने खाली न उतरता दुसर्या बाजूने उतरायचे होते.
हा वरून काढलेल्या उताराच्या पायवाटेचा रस्ता.
दुसर्या बाजूने उतरताना परत त्या बाजूचं एक तळं दिसायला लागलं.
आणि थोडा सूर्य बाहेर डोकावला तर ते पाचूसारखं चमचमू लागलं ना!
सुमारे सहा तास या स्वप्ननगरीची सैर करून खाली आलो.
एक व्हिडीओ देते.