नेमेचि येतो मग पानगळ ऋतु हे खरं असलं तरी पानगळीआधी उधळणारे ते रंग बघणे हा दरवर्षी एक सोहळा असतो. लाल,पिवळा, केशरी असे जणू वणवा पेटल्यासारखे रंग निसर्ग उधळतो. कितीदा बघितलं तरी मन भरत नाही असं ते निसर्गाचं रूप, डोळ्यात, मनात सर्व ठवू तेवढं थोडंच. अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो अक्षुंने- असं होऊन जातं.
अमेरिकेचा पूर्व किनारा या रंगपंचमी करीता प्रसिद्ध आहेच. पण पश्चिम किनाऱ्यावर इथल्या भागातही ही जादू थोड्या प्रमाणात दिसते. यंदा या फॉलच्या काळात काही छान ट्रेक्स केले आणि ही रंगांची लयलूट अनुभवली. त्याची फोटोरूपी सैर करवते.