अंतरीच्या गाभाऱ्यातून कुणी अनामिक साद घालतं..
अन सुरु होतो प्रवास स्वतःपासून स्वत्वापर्यंतचा..!
अवघा देह होतो राऊळ आणि सजू लागते मानसपूजा!
स्थिर पद्मासन होतं राऊळाची पायरी आणि
ध्यानस्थ हात होतात महाद्वार...
मस्तीष्क तेजोमय कळस! मिटलेल्या पापण्यात उजळतात तेजस्वि समया!!
हृदयात उमटतात सावळी स्पंदने आणि श्वास -प्रश्वासातून प्रतिध्वनी उमटतो विठ्ठल विठ्ठल.....
पंचेंद्रीय - पंचप्राण - अंतरात्मा संमेवर येऊन साधतात अनोखी एकादशी..
चंदनाचा दरवळ साक्ष देतो पूर्णत्वाची अन रोमारोमातून वाहू लागते चैतन्याची अनुभूती.. द्वनद्व संपतात अन नाद उमटतो....
निराकार चैतन्याशी
जुळे नाते निराकार
आसावल्या दिठी दिसें
विठू माऊली साकार......