टेलिपॅथीक कम्युनिकेशनबद्दल दोन शब्द..

टेलिपॅथीक कम्युनिकेशनबद्दल दोन शब्द..

नमस्कार. मी योगिता हर्णे, टेलिपॅथीक ऍनिमल, लॅन्ड अँड प्लांट कम्युनिकेटर. पलकला तिच्या रिसॉर्टच्या वेळी तिथे कशा वाईब्ज आहेत, काय करावं लागेल हे सांगितलं होतं, तिच्याच आग्रहामुळे हा लेखन प्रपंच.

तर, टेलिपॅथी म्हणजे नेमकं काय हे समजावून सांगते आधी. बरेचदा आपण म्हणतो कि हे खावंसं वाटतंय मला आणि अचानक कुठूनतरी तो पदार्थ मिळतो खायला. कधीतरी सकाळीच आठवतं, अरे ह्या मैत्रिणीशी बरेच दिवसात गप्पा मारल्या नाहीत आणि दिवसभरात कधीतरी तिचा फोन/ मेसेज येतो आपल्याला. तर इथे नेमकं काय होतं तर आपली इच्छा, बोलणं हे ब्रह्मांडात (युनिव्हर्स) पोचतं आणि ते पूर्ण करायला ब्रह्मांड मदत करत असतं.

टेलिपॅथीक कम्युनिकेटर म्हणून मी काय करते, तर तुमच्या प्राणी, वास्तू, जागा किंवा झाडांशी दुहेरी संवाद साधते. तुमचं म्हणणं त्या ऑब्जेक्टपर्यंत आणि त्याचं म्हणणं तुमच्यापर्यंत पोचवते. ह्यात मी as a मेडिएटर म्हणून काम करते.

बरेचदा प्राणी नेहमीपेक्षा वेगळा वागतो, चुकीच्या गोष्टी करतो जसे माती खाणे, कुठेही लिटर करणे, फर्निचर खराब करणे इत्यादी, ह्यावेळेस तुम्ही कम्युनिकेटरची मदत घेऊ शकता. हरवलेले प्राणीहि ह्याने शोधता येतात, अर्थात त्यांची परत यायची इच्छा असेल तरच.

लॅन्ड आणि वास्तू कम्युनिकेशही साधारण असंच असतं. ह्यात घराचे/ जागेचे वाईब्ज कसे आहेत, जर काही त्रास वाटत असेल तर त्यावर घर/ जागा काही सोल्युशन देत असेल तर ते देणं, इतर काही घराला आवडणाऱ्या गोष्टी घर करायला सांगतं, जसं एका घराला घंटीचा आवाज खूप आवडायचा, एका घराला धांगडधिंगा गाणी आवडत नव्हती असं. हे मी तुम्हाला सांगते.

प्लांट कम्युनिकेशनमध्ये बरेचदा झाडाला फुलं येत नाहीत, अचानक मान टाकतं झाड तर हे कशामुळे होतं हे मी सांगते.

ह्या सगळ्यासाठी मला ऑब्जेक्टचे डिटेल्स म्हणजे प्राण्याचं नाव, वय, घर/ जागेच्या मालकाचं नाव, पत्ता हे डिटेल्स लागतात. हे कम्युनिकेशन मी माझ्या घरीच बसून करते. मला प्राणी किंवा घराला भेट द्यायची गरज नसते. तुम्हाला सगळे रीडिंग्स दिल्यावर ते चेक करायचे असतात, त्यात काही वेगळं वाटलं तर तुम्ही मला पुन्हा संपर्क करू शकता. मी माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स खाली दिले आहेत. तुम्ही मला कॉल किंवा whatsapp ला मेसेज करू शकता.

तुम्ही क्लायंटचे रिव्युज बघण्यासाठी माझ्या फेसबुकपेजला भेट देऊ शकता.

योगिता हर्णे
9029284373

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle