खिरिसाठी म्हणून आलेला कन्डेस्ड मिल्क उरले होते ते वापरुन हे लाडु केले.झटपट सुरेख आणी नो- पाक पण नारळी पाकाचे चव देणारे लाडू होतात.
साहित्य
बारिक रवा- १ कप (अमेरिकेत असाल तर फाइन रवा आणी भारतात झिरो नबर आणा)
१/२कप ओला नारळ चव्,किस
१ कप कन्डेस्ड मिल्क स्विट्न्ड
२-३ चमचे तुप
२-३ चम्चे दुध
काजु,बदान्,किसमिस
वेलदोडा पुड
तुपावर बारिक रवा मध्यम आचेवर शिर्यासाठी भाजतो तसा भाजुन घ्यायचा,रवा गुलाबी भाजत आला की आच कमी करुन त्यातच ओल खोबर घालुन थोड भाजायच, एक कप कन्डेस्ड मिल्क टाकुन हलवुन घ्यायच, २-३ टेबलस्पुन दुध घालुन हलवत रहा.वेलची पुड घालून मिसळुन घ्या. मिश्रण आळले आणी पॅन पासुन सुटायला लागले की एका भान्ड्यात काढुन थोड कोमट होवू द्दायच मग लाडु वळायचे.
आवडीप्रमाणे सुकामेवा वरुन लावा किवा मिश्रणात मिसळा.
पाक करण वैगरे स्टेप वगळून नारळी पाकासारखी छान क्रिमी मौसर टेस्ट येते.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle