अर्धा किलो बारीक रवा दोनशे ग्रॅम तुपात मंद गॅस वर पंधरा एक मिनिट भाजला. नंतर त्यात साधारण दोन वाट्या नारळाचा चव घालून पुन्हा दहा एक मिनिट बारीक गॅसवर भाजत राहिले.
तीन वाट्या साखरेत ( आवडीनुसार कमी जास्त करू शकता )दीड वाटी पाणी घालून पाक करायला ठेवला. साखर विरघळल्या वर पाच एक मिनटानी पाक चेक करायला लागले . पाक ताटलीत घेऊन ती ताटली उभी केली की पाक खाली ओघळला नाही की झाला (आम्ही त्याला मधा इतपत म्हणतो ) ही माझी खूण. पण तार बघितली तर दोन येतात त्याच्या.
खिरिसाठी म्हणून आलेला कन्डेस्ड मिल्क उरले होते ते वापरुन हे लाडु केले.झटपट सुरेख आणी नो- पाक पण नारळी पाकाचे चव देणारे लाडू होतात.
साहित्य
बारिक रवा- १ कप (अमेरिकेत असाल तर फाइन रवा आणी भारतात झिरो नबर आणा)
१/२कप ओला नारळ चव्,किस
१ कप कन्डेस्ड मिल्क स्विट्न्ड
२-३ चमचे तुप
२-३ चम्चे दुध
काजु,बदान्,किसमिस
वेलदोडा पुड