रवा नारळ लाडू.
रेसिपी
अर्धा किलो बारीक रवा दोनशे ग्रॅम तुपात मंद गॅस वर पंधरा एक मिनिट भाजला. नंतर त्यात साधारण दोन वाट्या नारळाचा चव घालून पुन्हा दहा एक मिनिट बारीक गॅसवर भाजत राहिले.
तीन वाट्या साखरेत ( आवडीनुसार कमी जास्त करू शकता )दीड वाटी पाणी घालून पाक करायला ठेवला. साखर विरघळल्या वर पाच एक मिनटानी पाक चेक करायला लागले . पाक ताटलीत घेऊन ती ताटली उभी केली की पाक खाली ओघळला नाही की झाला (आम्ही त्याला मधा इतपत म्हणतो ) ही माझी खूण. पण तार बघितली तर दोन येतात त्याच्या.
पाक झाल्यावर त्यात भाजलेला रवा नारळ घातला आणि त्यावर झाकण ठेवलं घट्ट. हे मी पहिल्यांदा च केलं आणि बेस्ट result मिळालाय. मिश्रण गार व्हायला झाकण ठेवल्यामुळे वेळ लागला आणि त्यामुळे रवा पाकात चांगला मुरला. अगदी बारा तासांनी लाडू वळले तरी ही मिश्रण छान moist होत. लाडू ही मऊ आणि तरी ही खुसखुशीत झालेत. लहान मुलं खाणार आहेत म्हणून फोटोत कळत नसलं तरी आकाराने मुद्दामच लहान केले आहेत.
फोटो