अर्धा किलो बारीक रवा दोनशे ग्रॅम तुपात मंद गॅस वर पंधरा एक मिनिट भाजला. नंतर त्यात साधारण दोन वाट्या नारळाचा चव घालून पुन्हा दहा एक मिनिट बारीक गॅसवर भाजत राहिले.
तीन वाट्या साखरेत ( आवडीनुसार कमी जास्त करू शकता )दीड वाटी पाणी घालून पाक करायला ठेवला. साखर विरघळल्या वर पाच एक मिनटानी पाक चेक करायला लागले . पाक ताटलीत घेऊन ती ताटली उभी केली की पाक खाली ओघळला नाही की झाला (आम्ही त्याला मधा इतपत म्हणतो ) ही माझी खूण. पण तार बघितली तर दोन येतात त्याच्या.
कोकणी मेजवानी: मऊ भात किंवा गुरगुट्या भात:
आमच्याकडे दरवर्षी कमीअधिक प्रमाणात मुंबईकर नातेवाईक मे महिन्यात एकत्र स्नेहभेट ठरवून दोन दिवस येतात. अशाच भेटीच्या वेळी या मंडळींची सुप्रभात होते ती मऊ भाताने!
पाहुणे येणार म्हटलं की ठेवणीतली माळ्यावरची पितळी पातेली खाली उतरून राखेने चकचकीत केली जातात. माती आणि राख एकत्र करून ओलं करून त्याचा थर बाहेरून पातेल्याला दिला जातो, याला लेवण घेणे म्हणतात,यामुळे पातेलं जळत नाही आणि पदार्थ लागत नाही. चुलीवर आधण ठेवून
साहित्य:
१. जरा लहान आकाराचे almost पिकलेले आंबे (कडक हवेत, सुरकुत्या नको) - १० - १२ (मला हापूस आवडतात, पण जरा आंबटगोड आवडणारे रायवळ किंवा गावठी आंबेसुद्धा वापरू शकता)
२. गूळ - साधारण पाव किलो
३. तेल - वाटीभर
४. लाल मोहरी पावडर करून - वाटीभर
५. मेथी पावडर - दोन किंवा तीन टेस्पू
६. हिंग - दोन टेस्पू
७. मीठ - दोन टेस्पू किंवा आवडीनुसार
८. हळद - दोन टिस्पू
९. लाल तिखट - चार/पाच टेस्पू
१०. पाणी - एक लिटर
कृती:
१. आंबे नीट धुवून मग गॅसवर एका मोठ्या पातेल्यात पाणी घालून १० ते १५ मिनिटे उकडा. (कुकर वापरू नका, आत स्फोट होतील) :P उकडलेले आंबे एका सुती साडीवर गार आणि कोरडे करत ठेवा.